टी-२० विश्वचषकात आज भारतासमोर न्यूझीलंडचं आव्हान असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध सलामाची सामना गमावल्यामुळे भारतासाठी सेमी फायनलचा रस्ता खडतर झाला आहे. पाकिस्तानने आपले सलामीचे तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीतला प्रवेश जवळपास निश्चीत केला आहे. परंतू भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी आपले सलामीचे सामने गमावल्यामुळे आता ब गटातली शर्यत चुरशीची होणार आहे.
ADVERTISEMENT
भारतीय संघापुरता विचार करायला गेलं तर भारताला आजच्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे. न्यूझीलंडविरुद्धचा आजचा सामना भारताने जिंकला तर तर उर्वरित तीन सामन्यांमध्ये संघाला तुलनेने सोपं आव्हान आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला तर सेमी फायनलला त्यांचा रस्ता सोपा होऊ शकतो.
आजचा सामना जेवढा भारतासाठी महत्वाचा आहे तेवढात तो न्यूझीलंड संघासाठीही महत्वाचा आहे. आजच्या सामन्यात जो संघ हरेल तो पुढच्या सामन्यात आपला प्रतिस्पर्धी हरेल अशी प्रार्थना करेल. म्हणजेच भारताने आजचा सामना गमावला तर न्यूझीलंड पुढच्या सामन्यात हरू दे अशी प्रार्थना त्यांना करावी लागेल. याचसोबत उर्वरित तिन्ही सामन्यांमध्ये भारताला मोठा विजय मिळवावा लागणार आहे. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंडचे गुण समसमान होतील आणि नेट रनरेटच्या आधारावर सेमीफायनलचं तिकीट मिळेल.
T20 World Cup: ‘खेळाडूंना नाउमेद करु नका, न्यूझीलंडविरुद्ध सामना आपण जिंकू मग चित्र बदललेलं दिसेल’
पॉइंट टेबलवर नजर टाकली, तर सुपर-१२ चे सामने खेळले जात आहेत. पहिल्या गटात इंग्लंड अव्वल स्थानावर आहे. इंग्लंडने तिन्ही सामने जिंकले असून त्यांचे ६ गुण आहेत. इंग्लंडचा नेट रनरेट चारच्या आसपास आहे. दुसर्या गटाबद्दल बोलायचे झाले, तर पाकिस्तान अव्वलस्थानी आहे. भारताने आतापर्यंत फक्त एकच सामना खेळला आहे आणि भारत गटात पाचव्या स्थानावर आहे. आज भारताने विजय मिळवला, तर भारत तिसऱ्या क्रमांकावर जाईल. भारताचे पुढीस सामने अफगाणिस्तान, नामिबिया आणि स्कॉटलंडशी होणार आहेत. या संघांविरुद्ध भारत सहज सामना जिंकेल, अशी आशा आहे. त्यामुळे आजचा सामना खूप महत्त्वाचा आहे.
ADVERTISEMENT