टी-20 विश्वचषका स्पर्धेला रविवारपासून सुरूवात झाली असून, भारत आणि इंग्लंड यांच्यात पहिला सराव सामना सुरू झाला खेळला जात आहे. या सामन्या टॉससाठी मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मासोबत सलामीला फलंदाजीसाठी येणार नसल्याचं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
भारत-इंग्लंड सराव सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी टॉससाठी मैदानावर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने विश्वचषक स्पर्धेत भारताचे सलामीचे फलंदाज कोण असतील याबद्दलचं चित्र स्पष्ट केलं. सराव सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुबईत हा सामना होत आहे.
विराट कोहली म्हणाला, ‘आयपीएलपूर्वी परिस्थिती वेगळी होती. पण आयपीएलमध्ये केएल राहुलने ज्यापद्धतीने फलंदाजी केली आहे, त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चुकीचं ठरेल. रोहित शर्मा आधीपासूनच भारतासाठी वर्ल्डक्लास खेळाडू राहिलेला आहे. त्यामुळे या विश्वचषक स्पर्धेत मी तिसऱ्या क्रमांकावर खेळेन’, असं कोहली म्हणाला.
कोहलीच्या या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्य वाटू शकतं. कारण विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी विराट कोहलीनेच आपण रोहित शर्मासोबत ओपनिंगला येणार असल्याचं म्हटलं होतं. आयपीएल होण्यापूर्वी कोहली असं म्हणाला होता.
आयपीएलमध्ये केएल राहुलची जबरदस्त कामगिरी
पंजाब किंग्ज इलेव्हन संघाकडून खेळताना केएल राहुलने यंदाच्या आयपीएल हंगामात चांगल्या खेळाचं प्रदर्शन केलं. फॉर्मात असलेल्या केएल राहुलने या यावेळच्या आयपीएल स्पर्धेत 626 धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे.
केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी चांगली राहिल्याने विराट कोहलीने स्वतःऐवजी राहुलला सलामीवीर म्हणून बढती दिली. केएल राहुलने यापूर्वीही भारताकडून ओपनिंगला फलंदाजी केलेली आहे.
ADVERTISEMENT