न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी अवघे काही तास शिल्लक असताना टीम इंडियासमोर Playing XI चा यक्षप्रश्न कायम आहे. त्यातच हार्दिक पांड्याचं फॉर्मात नसणं हे भारतीय संघासाठी धोकादायक ठरत आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात हार्दिक पांड्यालाच संघात पुन्हा एकदा संधी द्यायची की शार्दुल ठाकूरला खेळवायचं हा प्रश्न संघासमोर आहे.
ADVERTISEMENT
परंतू भारताचा माजी गोलंदाज अजित आगरकरने न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात हार्दिकला संधी देणं महागात पडू शकतं असा सल्ला टीम इंडियाला दिला आहे.
T20 World Cup : हार्दिक की शार्दुल? न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी विराट कोहलीसमोर यक्षप्रश्न
“आपण हार्दिक पांड्याला नेट्समध्ये बॉलिंग करताना पाहिलं आहे. पण गेल्या काही महिन्यांमध्ये त्याने बॉलिंग केलेली नाहीये. एक गोलंदाज म्हणून सराव नसताना थेट सामन्यात बॉलिंग करणं किती कठीण असतं याचा मला अंदाज आहे. त्यामुळे जो गोलंदाज पूर्णपणे फिट नाहीये त्याला संधी देऊन तुम्ही करो या मरो च्या सामन्यात रिस्क घेऊ शकत नाही”, अजित आगरकर ESPNCricinfo शी बोलत होता.
या परिस्थितीसाठी मी हार्दिकला दोषी मानणार नाही. अशा परिस्थितीत जर तुम्ही अशा एका बॉलरकडून अपेक्षा करत आहात जो गेले काही महिने बॉलिंग करत नाहीये तर ते धोकादायक ठरु शकतं. माझ्यासाठी हार्दिक पांड्या न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात सहावा पर्याय नक्कीच नसेल असं परखड मत आगरकरने नोंदवलं.
अजित आगरकरच्या मते विराट कोहलीने मधल्या ओव्हर्समध्ये १-२ ओव्हर टाकल्यास इतर बॉलरवरचा ताण कमी होईल. हार्दिक बॉलर म्हणून संघासाठी किती उपयुक्त ठरु शकतो याची शाश्वती नसल्यामुळे हार्दिकला संघात स्थान देणं योग्य ठरणार नाही असंही अजित आगरकरने स्पष्ट केलं.
T20 World Cup : आज चुकीला माफी नाही, उपांत्य फेरीसाठी भारताला न्यूझीलंडविरुद्ध विजय गरजेचा
ADVERTISEMENT