टीम इंडियाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह अडकला लग्नाच्या बेडीत

मुंबई तक

• 10:38 AM • 15 Mar 2021

भारतीय संघाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकला आहे. प्रसिद्ध Sports Anchor संजना गणेशनसोबत जसप्रीतचा पारंपरिक पद्धतीने गोव्यामध्ये विवाहसोहळा पार पडला. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व सर्व नियम पाळून दोन्ही परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुंबई इंडियन्सने आपल्या फेसबूक पेजवर या लग्नाचे काही फोटोग्राफ शेअर केले आहेत. इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट मॅचमधून […]

Mumbaitak
follow google news

भारतीय संघाचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकला आहे. प्रसिद्ध Sports Anchor संजना गणेशनसोबत जसप्रीतचा पारंपरिक पद्धतीने गोव्यामध्ये विवाहसोहळा पार पडला. सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती व सर्व नियम पाळून दोन्ही परिवारातील मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुंबई इंडियन्सने आपल्या फेसबूक पेजवर या लग्नाचे काही फोटोग्राफ शेअर केले आहेत.

हे वाचलं का?

इंग्लंडविरुद्ध चौथ्या टेस्ट मॅचमधून जसप्रीत बुमराहने खासगी कारण देऊन माघार घेतली होती. यानंतर त्याच्या लग्नाबद्दल अनेक तर्क-वितर्क लढवले जात होते. यानंतर जसप्रीत बुमराहची होणारी बायको कोण असेल याबद्दलही वेगवेगळ्या माहिती समोर येत होत्या. जसप्रीत आणि संजना गणेशनने दरम्यानच्या काळात या वृत्ताबद्दल कोणतीही प्रतिक्रिया न देणं पसंत केलं होतं. या दोघांनाही आपला विवाहसोहळा खासगी ठेवायचा होता यासाठी लग्नसोहळ्यास उपस्थित असलेल्या लोकांना मोबाईल फोन सोबत ठेवण्यास मनाई करण्यात आली होती.

रोहित लालची, विराट कोहली रागीट…जाणून घ्या धोनी असं का म्हणाला?

संजना गणेशन Star Sports या वाहिनीवर अँकर म्हणून काम करते. अनेकदा क्रिकेट मॅचदरम्यान शो मध्ये, खेळाडूंचे इंटरव्ह्यू घेत असताना संजना गणेशनला आपण सर्वांनी पाहिलं आहे. २०१४ साली Miss India Pageant, MTV Splitsvilla यासारख्या शो मध्ये संजना सहभागी झाली होती.

    follow whatsapp