दिग्गज यष्टिरक्षक-फलंदाज अॅडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) आयपीएलपासून (IPL) मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. आयपीएलची लोकप्रियता वाढलेली पाहता गिलख्रिस्ट म्हणाला की ही लीग आता इतर लीगसाठी धोकादायक ठरत आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज डेव्हिड वॉर्नरवर (David Warner) आलेल्या बातम्यांनंतर गिलख्रिस्टने हे वक्तव्य केलं आहे. या मोसमात डेव्हिड वॉर्नर बिग बॅश लीगमधून बाहेर पडण्यााची शक्यता आहे. कारण तो UAE T20 लीगमध्ये खेळणार असल्याचे वृत्त आहे. तीन आयपीएल फ्रँचायझींनी यूएई लीगमध्ये गुंतवणूक केली आहे.
ADVERTISEMENT
यूएईची लीग बनली बिग बॅशसाठी खतरा!
यूएईमध्ये होणाऱ्या या लीगमध्ये मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्सने गुंतवणूक केली आहे. त्यामुळे वॉर्नर आणि इतर अनेक मोठे खेळाडू त्या लीगकडे वळू शकतात. यामुळे बिग बॅश लीगचे थेट नुकसान होऊ शकते. सेनच्या रेडिओ कार्यक्रमात गिलख्रिस्ट म्हणाला, ‘डेव्हिड वॉर्नरला बीबीएलमध्ये खेळण्यासाठी जबरदस्ती करता येणार नाही हे मला माहिती आहे.
केवळ वॉर्नरच नाही तर इतर खेळाडूही त्या लीगमध्ये सामील होण्याची चिन्हे आहेत. आयपीएल फँचायझीचा जागतीक स्तरावर वाढलेला दबदबा पाहता इतर लिगची गळचेपी होत असल्याचं वक्तव्य अॅडम गिलख्रिस्टने केले आहे.
अॅडम गिलख्रिस्टने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला इशारा
अॅडम गिलख्रिस्टने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला या प्रकरणात लक्ष घालण्याचा सल्ला दिला आहे. कारण इतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूही वॉर्नरसारखा मार्ग अवलंबू शकतात. साहजिकच यूएईमध्ये होणाऱ्या टी-20 लीगमध्ये बिग बॅशपेक्षा खेळाडूंना जास्त पैसे मिळतील आणि ते त्याची निवड करतील. गिलख्रिस्ट म्हणाला, ‘जर उद्या गिलख्रिस्ट म्हणाला, सॉरी ऑस्ट्रेलियन क्रिकेट, मी माझ्या भारतीय फ्रँचायझी संघांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये खेळणार आहे, तर तुम्ही त्याला प्रश्न विचारू शकत नाही, तो त्याचा विशेषाधिकार आहे.
ऑस्ट्रेलियासाठी 96 कसोटी आणि 287 एकदिवसीय सामने खेळणारा गिलख्रिस्ट यापुर्वी डेक्कन चार्जर्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब सारख्या आयपीएल संघांसाठी खेळला आहे. २००९ मध्ये डेक्कन चार्जर्सने आयपीएलचे जेतेपद पटकावले तेव्हा गिलख्रिस्टचा कर्णधार होता.
ADVERTISEMENT