महिला सह-कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज, ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनचा राजीनामा

मुंबई तक

• 09:08 AM • 19 Nov 2021

Ashes कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांपूर्वी आपल्या महिला सह कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पेनची चौकशी सुरु होती. होबार्टमध्ये शुक्रवारी टीम पेनने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पदावरुन पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरीही Ashes मालिकेत आपण […]

Mumbaitak
follow google news

Ashes कसोटी मालिकेआधी ऑस्ट्रेलियन संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चार वर्षांपूर्वी आपल्या महिला सह कर्मचाऱ्याला आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून पेनची चौकशी सुरु होती.

हे वाचलं का?

होबार्टमध्ये शुक्रवारी टीम पेनने प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण पदावरुन पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरीही Ashes मालिकेत आपण खेळणार असल्याचं टीम पेनने सांगितलं. २०१७ साली टीम पेनला ऑस्ट्रेलियन कसोटी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपावण्यात आली होती. याचदरम्यान टीम पेनने हा मेसेज पाठवल्याचं कळतंय.

“आज, मी माझ्या कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचं ठरवलं आहे. माझ्यासाठी हा अत्यंत खडतर निर्णय होता. परंतू माझ्यासाठी, माझ्या परिवारासाठी आणि क्रिकेटसाठी हा योग्य निर्णय होता. चार वर्षांपूर्वी माझ्या एका महिला सह कर्मचाऱ्याशी संबंधित मेसेज बद्दल चौकशी होत होती, ज्यात मी पूर्णपणे सहकार्य दिलं. या चौकशीत मी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या कोणत्याही नियमाचा भंग केलेला नसल्याचं समोर आलंय.”

परंतू ज्यावेळी हा प्रसंग घडला त्याबद्दल मला अजुनही पश्चाताप आहे. मी माझ्या पत्नी आणि परिवाराशी याबद्दल बोललो आहे. हा प्रसंग घडून गेला असून मला आता पुढच्या करिवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. परंतू काही दिवसांपूर्वीच आमच्यातले खासगी संदेश हे सार्वजनिक केले जात असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. यामुळे माझ्या पत्नी आणि परिवाराला झालेल्या त्रासाबद्दल मला खेद वाटतो. ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या प्रतिमेचं होणारं नुकसान पाहता मी कर्णधारपदाचा राजीनामा देणं हा एकमेव योग्य पर्याय असल्याचं टीम पेनने सांगितलं.

आगामी Ashes सिरीजमध्ये या प्रकरणाचे पडसाद संघावर उमटायला नकोत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. त्यामुळे कर्णधारपद सोडण्याची हीच योग्य वेळ असल्याचं मला वाटलं. आतापर्यंत मला मिळालेल्या सहकार्याबद्दल मी आपला आभारी असल्याचं म्हणत पेनने आपल्या राजीनाम्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे ८ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या आगामी Ashes मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाचं प्रतिनिधीत्व कोण करतं याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp