Video : कसं काय? Tokyo Olympic ला जाणाऱ्या तिरंदाज प्रवीण जाधवला मोदी जेव्हा मराठीतून प्रश्न विचारतात…

मुंबई तक

• 04:42 PM • 13 Jul 2021

२३ जुलैपासून जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून यापैकी निवडक खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. तिरंदाजी प्रकारात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवसोबतही मोदींनी संवाद साधला. मुळचा साताऱ्याचा प्रवीण जाधव हा तिरंदाजी प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. कसं काय प्रवीण? […]

Mumbaitak
follow google news

२३ जुलैपासून जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. १०० पेक्षा जास्त भारतीय खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून यापैकी निवडक खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

हे वाचलं का?

तिरंदाजी प्रकारात निवड झालेल्या महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवसोबतही मोदींनी संवाद साधला. मुळचा साताऱ्याचा प्रवीण जाधव हा तिरंदाजी प्रकारात भारताचं प्रतिनिधीत्व करणार आहे. कसं काय प्रवीण? असा प्रश्न विचारत मोदींनी प्रवीणसोबतच्या संवादाला सुरुवात केली. पाहा हा व्हिडीओ…

सुरुवातीला अॅथलिट म्हणून सुरुवात केलेल्या प्रवीणने नंतर तिरंदाजी हा खेळ कसा निवडला ते तुझ्या आयुष्यात पालकांच्या योगदानाबद्दल मोदींनी प्रवीण जाधवशी गप्पा मारल्या. यावेळी प्रवीण जाधवचे पालकही उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवीणच्या पालकांशीही गप्पा मारत, प्रकृती ठीक आहे ना असं म्हणत त्यांची विचारपूस केली.

साताऱ्याचा सुपुत्र प्रवीण जाधव याची Tokyo Olympics 2021 साठी निवड

हालाकीची आर्थिक परिस्थिती असलेल्या प्रवीण जाधवचे आई-वडील हे रोजंदारीवर काम करुन घर चालवतात. आपल्या आई-वडिलांचे कष्ट पाहून प्रवीणने नेटाने सराव करत तिरंदाजीचा सराव करुन टोकियोचं तिकीट मिळवलं. आपल्या मुलाप्रमाणेच मुलींनीही खेळात चांगली कामगिरी करुन देशासाठी पदक मिळवावं अशी इच्छा प्रवीणच्या पालकांनी व्यक्त केली. यावेळी मोदींनीही प्रवीणला जोमात खेळ असं म्हणत शुभेच्छा दिल्या.

Man Ki Baat : Tokyo Olympic चं तिकीट मिळवलेल्या मराठमोळ्या प्रवीण जाधवच्या संघर्षाची मोदींनी घेतली दखल

    follow whatsapp