Tokyo Olympic 2020 : दिपीका कुमारी पदकापासून केवळ एक पाऊल दूर

मुंबई तक

• 02:03 AM • 30 Jul 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. रशियाच्या केस्निका पेरोव्हावर अटीतटीच्या लढतीत ६-५ ने मात करत दिपीकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत किमान कांस्यपदक मिळवण्यासाठी दिपीकाला आता एका विजयाची तर सुवर्णपदकासाठी दोन विजयांची गरज आहे. 1/8 Eliminations च्या पहिल्याच सेटची दिपीकाने चांगली सुरुवात केली. २८-२५ च्या फरकाने पहिला सेट […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताची महिला तिरंदाज दिपीका कुमारीची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. रशियाच्या केस्निका पेरोव्हावर अटीतटीच्या लढतीत ६-५ ने मात करत दिपीकाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे तिरंदाजीत किमान कांस्यपदक मिळवण्यासाठी दिपीकाला आता एका विजयाची तर सुवर्णपदकासाठी दोन विजयांची गरज आहे.

हे वाचलं का?

1/8 Eliminations च्या पहिल्याच सेटची दिपीकाने चांगली सुरुवात केली. २८-२५ च्या फरकाने पहिला सेट जिंकत दिपीकाने २ सेट पॉईंट जिंकले. परंतू दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या केस्नियाने बरोबरी साधत सेट जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये दिपीकाने आपला सर्व अनुभव पणाला लावत २८-२७ अशी एका गुणाच्या फरकाने बाजी मारली.

परंतू रशियाच्या केस्नियाने चौथा सेट बरोबरी सोडवत आणि पाचव्या सेटमध्ये ३ गुणांच्या फरकाने सेट जिंकत पुन्हा एकदा सामना बरोबरीत सोडवला. अखेरीस निकाल शूट ऑफमध्ये घेण्यात आला. ज्यात रशियाच्या केस्नियाने ७ तर दिपीकाने १० गुणांची कमाई करत आपला विजय निश्चीत केला. उपांत्यपूर्व फेरीत दिपीकासमोर कोरियाच्या अॅन सॅनचं आव्हान असणार आहे. भारतीय वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता ही मॅच सुरु होणार आहे.

    follow whatsapp