Tokyo Olympic 2020 : P.V.Sindhu ची बाद फेरीत धडक, हाँगकाँगच्या खेळाडूवर मात

मुंबई तक

• 06:06 AM • 28 Jul 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतर भारतीय खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना, बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने पदकाची आशा पल्लवित ठेवली आहे. साखळी फेरीत आपला दुसरा सामना खेळत असताना सिंधूने हाँगकाँगच्या खेळाडूवर २१-९, २१-१६ अशा दोन सेटमध्ये मात केली. या विजयासह सिंधूने बाद फेरीत प्रवेश केला आहे. २६ वर्षीय सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतर भारतीय खेळाडू निराशाजनक कामगिरी करत असताना, बॅटमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने पदकाची आशा पल्लवित ठेवली आहे. साखळी फेरीत आपला दुसरा सामना खेळत असताना सिंधूने हाँगकाँगच्या खेळाडूवर २१-९, २१-१६ अशा दोन सेटमध्ये मात केली. या विजयासह सिंधूने बाद फेरीत प्रवेश केला आहे.

हे वाचलं का?

२६ वर्षीय सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. यंदाच्या स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू पात्र ठरु शकले नाहीत. पुरुष एकेरीत साई प्रणीतने निराशाजनक कामगिरी केली असून पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी जोडीचं आव्हानही संपुष्टात आलंय. त्यामुळे बॅडमिंटनमध्ये सिंधूच्या रुपाने भारताला एकमेव पदकाची आशा आहे.

जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या सिंधूला बाद फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्डटचा सामना करायचा आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये सिंधूने मियाला ४ वेळा हरवलं आहे तर मिया फक्त एकदाच यशस्वी झाली आहे. थायलंड ओपन स्पर्धेत मियाने यंदाच्या वर्षी सिंधूला हरवलं होतं. आपल्या पहिल्या सामन्यात सिंधूने इस्राईलच्या क्सेनिका पोलिकार्पोवाचा पराभव केला होता.

हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात सिंधूने आपल्या बॅकहँडचा सढळहस्ते वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूला चांगलंच दमवलं. दुसऱ्या सेटमध्ये सिंधूच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने चांगली लढत दिली परंतू तिचे प्रयत्न फोल ठरले.

    follow whatsapp