Tokyo Olympic : Rowing मध्ये पदकाची आशा वाढली, अर्जुन जट-अरविंद सिंग जोडी सेमीफायनलमध्ये दाखल

मुंबई तक

• 04:09 AM • 25 Jul 2021

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका क्रीडा प्रकारात पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रोविंग प्रकारात Lightweight Double Sculls मधील रेपिचाज राऊंडमध्ये अर्जुन जट आणि अरविंद सिंग जोडीने आश्वासक कामगिरी करत तिसरं स्थान पटकावलं आहे. भारतीय जोडीने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत. ६:५१:३६ अशी वेळ नोंदवत भारतीय जोडी रेपिचाज राऊंडमध्ये तिसऱ्या स्थानावर […]

Mumbaitak
follow google news

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला आणखी एका क्रीडा प्रकारात पदकाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रोविंग प्रकारात Lightweight Double Sculls मधील रेपिचाज राऊंडमध्ये अर्जुन जट आणि अरविंद सिंग जोडीने आश्वासक कामगिरी करत तिसरं स्थान पटकावलं आहे. भारतीय जोडीने सेमी फायनलमध्ये प्रवेश करत भारताच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या आहेत.

हे वाचलं का?

६:५१:३६ अशी वेळ नोंदवत भारतीय जोडी रेपिचाज राऊंडमध्ये तिसऱ्या स्थानावर आली. पोलंडने या फेरीत पहिलं तर स्पेनने दुसरं स्थान मिळवलं. भारतीय जोडीने हळुहळु आपला वेग वाढवत उझबेगिस्तानच्या टीमला मागे टाकलं. १००० मी. पार केल्यानंतर भारतीय जोडीने शेवटपर्यंत ही आघाडी कायम ठेवली.

त्याआधी काल भारतीय जोडीने lightweight double sculls heat प्रकारात भारतीय जोडीने पाचवं स्थान मिळवलं. ज्यामुळे त्यांना थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश न मिळता रेपिचाज राऊंडमध्ये खेळावं लागलं. त्यामुळे पुढच्या फेरीत भारतीय जोडी कशी खेळ करते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

    follow whatsapp