Tokyo Paralympics मधल्या टेबल टेनिस स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलने (Bhavina Patel) इतिहास रचला आहे. त्यामुळे भारताचं पॅरालिम्पिकमधलं पहिलं पदक निश्चित झालं आहे. भारताला सुवर्णपदक मिळवून देण्यापासून भाविना अवघं एक पाऊल दूर आहे. भाविना पटेलने चीनच्या मियाओ झांगचा पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या लढतीत भाविनाने मियाओचा 3-2 (11-7, 7-11, 4-11, 11-9, 8-11) असा पराभव केला आहे. भाविनाने या विजयासह फायनलमध्ये धडक मारली आहे. टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिली पदक तिने निश्चित केलं आहे.
ADVERTISEMENT
मी माझ्या दृष्टीने 100 टक्के प्रयत्न केले आहेत. अंतिम फेरीसाठी मी मानसिकदृष्ट्या तयार आहे. काहीही अशक्य नसतं हे मी सिद्ध केलं आहे असंही भाविनाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी खूप आनंदी आहे असंही भाविनाने म्हटलं आहे.
भाविनाने चांगल्या विजयासह फायनलमध्ये धडक दिली आहे. आता ती सुवर्णपदक जिंकेल असा मला विश्वास वाटतो असं वक्तव्य भाविनाचे वडील हसमुखभाई पटेल यांनी केलं आहे. टोकियो मध्ये सुरू असलेल्या पॅराऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिसच्या महिला एकेरी स्पर्धेत भारताच्या भाविना पटेलने शुक्रवारीही चमकदार कामगिरी केली. भाविनाचा सर्बियाची खेळाडू बोरिस्लावा राकोविच हिच्यासोबत मुकाबला झाला. या सामन्यात भाविनाने दणदणीत विजय मिळवला आणि सेमी फायनलमध्ये प्रवेश केला.
भाविनाने सर्बियाच्या राकोविचचा तीन गेममध्ये ११-५, ११-६, ११-७ अशा फरकाने पराभव केला. या विजयाबरोबरच भाविना उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाली असून, ती सुवर्ण पदकापासून दोन पावलं दूर आहे. उपांत्य फेरी गाठल्यानंतर भाविना भावूक झाली. तिचे डोळेही भरून आले होते. ‘मला संपूर्ण देशाचे आभार मानायचे आहेत; कारण मी त्यांच्यामुळे इथे पोहोचले आहे. तुमचं प्रेम पाठवत रहा’, असे भावोद्गार भाविनाने सामन्यानंतर काढले. आता आज तिने चीनच्या मियाओ झांगला मात देत फायनलमध्ये धडक मारली आहे. पुढच्या सामन्यात तिची कामगिरी कशी असेल आणि ती भारताला सुवर्णपदक मिळवून देईल का? याकडे सगळ्या देशाचं लक्ष असणार आहे.
ADVERTISEMENT