Tokyo Paralympics : थाळीफेक प्रकारात भारताला आणखी एक पदक, योगेश काठुनियाने कमावलं रौप्यपदक

मुंबई तक

• 05:21 AM • 30 Aug 2021

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवसही भारतीयांसाठी अत्यंत चांगला गेला आहे. थाळीफेक प्रकारात भारताच्या योगेश काठुनियाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. ४४.३८ मी. लांब थाळी फेकत योगेशने भारताला आणखी एका पदकाची कमाई करुन दिली. या स्पर्धेतलं भारताचं हे चौथं रौप्यपदक ठरलं आहे. योगेशव्यतिरीक्त टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने, उंच उडीत निषाद कुमारने, भालाफेकीत देवेंद्र झाजरियाने रौप्यपदक मिळवलं आहे. […]

Mumbaitak
follow google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत सोमवारचा दिवसही भारतीयांसाठी अत्यंत चांगला गेला आहे. थाळीफेक प्रकारात भारताच्या योगेश काठुनियाने रौप्यपदकाची कमाई केली आहे. ४४.३८ मी. लांब थाळी फेकत योगेशने भारताला आणखी एका पदकाची कमाई करुन दिली. या स्पर्धेतलं भारताचं हे चौथं रौप्यपदक ठरलं आहे.

हे वाचलं का?

योगेशव्यतिरीक्त टेबल टेनिसमध्ये भाविना पटेलने, उंच उडीत निषाद कुमारने, भालाफेकीत देवेंद्र झाजरियाने रौप्यपदक मिळवलं आहे. F56 प्रकारात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या योगेशने सुरुवात चांगली केली होती. बहुतांश फेऱ्यांमध्ये योगेशने आपली आघाडी टिकवून ठेवली होती. परंतू रिओ पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या बटिस्टा सांतोसने ४५.५९ मी. लांब थाळी फेकत योगेशला मागे ढकललं. ब्राझिलच्या या खेळाडूने केलेली कामगिरी त्याला पुन्हा एकदा गोल्ड मेडल मिळवून देण्यासाठी पुरेशी ठरली.

Tokyo Paralympics : भारतीय खेळाडूंच्या भाल्याने घेतला पदकाचा वेध, देवेंद्र झाजरियाला रौप्यपदक

क्युबाचा खेळाडू डिआज अल्डानाला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. योगेशने आपल्या पहिल्याच प्रयत्नात फाऊल केल्यामुळे भारतीयांची निराशा झाली. परंतू ही निराशा मागे टाकत योगेशने दुसऱ्या प्रयत्नात ४२.८४ मी. लांब थाळी फेकून पदकांच्या शर्यतीत आघाडी घेतली. यानंतरही योगेशचे काही प्रयत्न फोल गेले. परंतू ४३.५५ आणि ४४.३८ अशी सर्वोत्तम कामगिरी करत योगेशने आघाडी मिळवली. परंतू यानंतर ब्राझिलच्या खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करत भारताच्या सुवर्णपदकाच्या आशा संपुष्टात आणल्या.

मुळचा नवी दिल्लीचा असलेल्या योगेशला वयाच्या ८ व्या वर्षी अर्धांगवायूचा झटका आला, ज्यात त्याचे दोन्ही पाय निकामी झाले. परंतू योगेशने यानंतर हार न मानता २०१८ साली पॅरास्पोर्ट्स प्रकारात पदार्पण केलं. यानंतर अवघ्या काही वर्षांच्या सरावात त्याने केलेली कामगिरी ही खरंच कौतुकास्पद मानली जात आहे.

Tokyo Paralympics : भारताकडून पदकांची Hat Trick, थाळीफेक प्रकारात विनोद कुमारला कांस्यपदक

    follow whatsapp