Virat Kohli vs Gautam Gambhir Fight : रॉयल चॅंलेजर्स बंगळुरूचा (Royal Challengers Banglore) खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) आणि लखनऊचा (Lucknow Super Jaints) कोचिंग स्टाफ गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात पुन्हा एकदा राडा झाल्याची आयपीएलमध्ये नुकतीच घटना घडली होती. या राड्याची चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात सुरु आहे. मात्र हा नेमका राडा कसा सुरू झाला? खेळाडूंमध्ये मैदानावर काय शाब्दीक वाद झाला होता.याची संपूर्ण माहिती आता पीटीआयने समोर आणली आहे. त्यामुळे जाणून घेऊयात नेमकी राड्याला कशी सुरुवात झाली.(virat kohli and gautam gambhir dispute after match video viral in social media lsg vs rcb)
ADVERTISEMENT
मैदानात राडा कसा सुरु झाला…
लखनऊचा (Lucknow Super Jaints) 18 धावांनी पराभव केल्यानंतर आरसीबीने जल्लोष केला होता. या जल्लोषानंतर अनेक प्रतिस्पर्धी खेळाडू एकमेकांशी संवाद साधत आहे. सामन्या दरम्यानच खुपच गरमागरमी झाली होती.यावरच खेळाडूंमध्ये चर्चा सुरु होती.
हे ही वाचा : VIDEO : आयपीएलच्या मैदानात तुफान राडा,फॅन्स आपापसातच भिडले
सामना संपल्यानंतर मेयर्स आणि विराट कोहली एकत्र चालत होते. या दरम्यान मेयर्सने कोहलीला विचारले की, तो सामन्या दरम्या सतत अपशब्द का वापरत होता. यावर तो माझ्याकडे पाहत होता? असे उत्तर विराटने दिले. याआधी अमित मिश्राने अंपायर्सकडे विराट कोहली नवीन उल हकला (Naveen ul haw) शिवीगाळ करत असल्याची तक्रार दिली होती. या दरम्यान मेयर्स आणि विराटमध्ये चर्चा सुरु असताना ,गौतम गंभीरने मेयर्सला ओढत त्याला विराटशी न बोलण्याचा सल्ला दिला. या दरम्यानच विराटने काही तरी टिपण्णी केली आणि वादाता तोंड फुटले होते. यानंतर गौतम आणि विराटमध्ये शाब्दीक युद्ध ऱंगले होते.
गौतम-विराटमधला शाब्दीक वाद?
गौतम गंभीर : काय बोलायचंय बोल?
विराट कोहली : मी तुम्हाला काही बोललोच नाही, तुम्ही का मध्ये घुसताय?
गौतम गंभीर : तु जर माझ्या खेळाडूला काही बोलला आहेस, म्हणजे तु माझ्या कुटुंबातील व्यक्तीला शिविगाळ केली आहेस.
विराट कोहली : मग तुम्ही तूमच्या कुटूंबाला सांभाळून ठेवा.
गौतम गंभीर : (दोघांना एकमेकांपासून दुर करत असताना गौतमने उत्तर दिले) मग तू आता मला शिकवणार का? असा सवाल गंभीरने केला.
असं हायव्होल्टेज संभाषण या खेळाडूंमध्ये झाले होते.
हे ही वाचा : WTC सामन्यापुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत
असा रंगला सामना…
आयपीएलमध्ये 10 एप्रिल रोजी आरसीबी आणि लखनऊमध्ये सामना रंगला होता. लखनऊने त्या सामन्यात 1 विकेटने आरसीबीची पराभव केला होता. या पराभवानंतर गौतम गंभीरने मैदानात येऊन तोंडावर बोट ठेवून आरसीबीच्या फॅन्सना शांत राहण्याची खुन केली होती. इथून खरं तर हा वाद सुरु झाला होता. या वादानंतर 1 मे रोजी रंगलेल्या सामन्यात आरसीबीने लखनऊचा 18 धावांनी पराभव करत 10 एप्रिलच्या पराभवाचा बदला घेतला होता.
आरसीबीने लखनऊला विजयासाठी 127 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या लखनऊला 19.5 ओव्हरमध्ये 108 धावात गुंडाळल होते. आणि अशाप्रकारे आरसीबीने 18 धावांनी लखनऊचा पराभव केला.
ADVERTISEMENT