ADVERTISEMENT
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघात कसोटी सुरू आहे.
या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी स्टार फलंदाज विराट कोहलीने नाबाद अर्धशतक ठोकलं आहे.
कोहलीने 14 महिन्यांमध्ये 16 कसोटी सामन्यांमध्ये हे पहिल्यांदाच अर्धशतक झळकावलं आहे. याआधी जानेवारी २०२२ मध्ये ही कामगिरी केली होती.
या खेळीत कोहलीने कसोटी क्रिकेट सामन्यातील चार हजार धावाही पूर्ण केल्या.
विराट कोहली हा टीम इंडियाचा पाचवा फलंदाज आहे, ज्याने मायदेशात चार हजारांहून अधिक धावा केल्या आहेत.
कोहलीच्या आधी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी ही कामगिरी केलेली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर आहे.
ADVERTISEMENT