कॅप्टन्सी सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी, Virat कडून तरीही निर्णय न आल्याने BCCI कडून नेतृत्वबदल

मुंबई तक

• 03:04 AM • 09 Dec 2021

८ डिसेंबर ही तारीख भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहणार आहे. बीसीसीआयने या दिवशी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा संघ जाहीर करताना महत्वाचे निर्णय घेतले आहेत. टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं आहे. पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयने विराट कोहलीला वन-डे संघाचं कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता. परंतू या […]

Mumbaitak
follow google news

८ डिसेंबर ही तारीख भारतीय क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहणार आहे. बीसीसीआयने या दिवशी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीचा संघ जाहीर करताना महत्वाचे निर्णय घेतले आहेत. टी-२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने आता विराट कोहलीकडून वन-डे संघाचं कर्णधारपदही काढून घेतलं आहे.

हे वाचलं का?

पीटीआयने दिलेल्या बातमीनुसार बीसीसीआयने विराट कोहलीला वन-डे संघाचं कर्णधारपद सोडण्यासाठी ४८ तासांचा अवधी दिला होता. परंतू या वेळेतही विराटने कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर न केल्यामुळे ४९ व्या तासाला बीसीसीआयने नेतृत्वबदलाची घोषणा करत रोहित शर्माच्या हाती वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवलं आहे.

Rohit Sharma ODI Captain: टी-20 नंतर वनडेचं कॅप्टन पदही रोहित शर्माकडे, कोहलीला आणखी एक धक्का

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी संघ जाहीर करण्यात आलेल्या प्रेस रिलीजमध्ये बीसीसीआयने शेवटच्या एका ओळीत, वन-डे संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे देण्यात आलेलं आहे असा उल्लेख केला आहे. या एका ओळीच्या उल्लेखात पडद्यामागे काय-काय घडामोडी घडल्या असतील याची कल्पना येते अशी चर्चा सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये सुरु आहे.

Team India Squad: अफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, अजिंक्य रहाणेने गमावलं उपकर्णधारपद

टी-२० विश्वचषकात विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पुन्हा एकदा संधी गमावली. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर आगामी काळात बीसीसीआय संघबदल करणार हे निश्चीत होतं. महत्वाची गोष्ट म्हणजे विराट कोहलीला कर्णधारपदावरुन काढताना बीसीसीआयने रोहित शर्माच्या खांद्यावरची जबाबदारी वाढवली आहे. टी-२० आणि वन-डे संघाच्या कर्णदारपदासोबतच रोहित शर्माकडे कसोटी संघाचं उप-कर्णधारपदही असणार आहे. २०२३ साली भारतात वन-डे विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेत बीसीसीआय रोहितच्या नेतृत्वात संघ मैदानात उतरवणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

आयसीसी स्पर्धांमध्ये संघाला विजेतेपद मिळवून देण्यात कोहली सातत्याने अपयशी ठरला आहे. त्यामुळे बीसीसीआय संघनेतृत्वात बदल करणार हे निश्चीत होतं. बीसीसीआयने ४८ तासांचा अवधी देत कोहलीला सन्मानाने पद सोडण्याचा अवधी दिला होता. परंतू निर्णय जाहीर न करत कोहलीने एका अर्थाने बीसीसीआयला आव्हान देत आपल्याला काढून टाकण्यास सांगितलं आहे. यानंतर बीसीसीआयनेही तात्काळ निर्णय जाहीर करत विराट कोहलीची कॅप्टन्सी संपुष्टात आणली आहे.

व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये कॅप्टन म्हणून विराट कोहलीची कामगिरी –

वन-डे क्रिकेट – ९५ सामने, ६५ विजय, २७ पराभव, १ सामना बरोबरीत तर २ सामने अनिर्णित

टी-२० क्रिकेट – ५० सामने, ३० विजय, १६ पराभव, २ सामने बरोबरीत तर २ सामने अनिर्णित

महेंद्रसिंह धोनीच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या विराट कोहलीने नंतर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं. एकीकडे ऑस्ट्रेलियाचा अरॉन फिंच, इंग्लंडचा ओएन मॉर्गन यांनी आपल्या संघांना आयसीसी स्पर्धांचं विजेतेपद मिळवून देण्यात बाजी मारली परंतू विराट कोहली या निकषांत सातत्याने अपयशी ठरला. मधल्या काळात बीसीसीआयकडून विराटला चांगला पाठींबा मिळत होता. परंतू नंतरच्या काळात विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये फूट पडली ज्याचा फटका संघाला महत्वाच्या स्पर्धांमध्ये बसला. याच कारणांमुळे बीसीसीआयने विराट कोहलीला वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन हटवलं असल्याची चर्चा आहे.

    follow whatsapp