वेस्ट इंडिजविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. विराट कोहली आणि ऋषभ पंतचं अर्धशतक हे भारतीय डावाचं वैशिष्ट्य ठरलं. परंतू फॉर्मात आलेल्या विराट कोहलीबद्दल बीसीसीआयने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. तिसऱ्या टी-२० सामन्याआधी विराटला बायो बबलमधून ब्रेक देण्यात आला असून तो तिसरा टी-२० सामना खेळणार नाहीये. विराटसोबतच ऋषभ पंतलाही तिसऱ्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
अखेरच्या टी-२० सामन्यासोबत विराट आणि ऋषभ हे आगामी श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिकाही खेळणार नाहीयेत. २४ फेब्रुवारीपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. ज्यातील पहिला सामना लखनऊत तर उर्वरित दोन सामने २६ आणि २७ फेब्रुवारीला धर्मशाळा येथे खेळवले जातील. विराट आणि ऋषभ श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात दाखल होतील अशी माहिती कळते आहे.
४१ बॉलमध्ये विराट कोहलीने ५२ धावांची खेळी करत आपण अजुनही फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं. विराटची टी-२० मधली अखरेची हाफ सेंच्युरी वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सामन्यात आली होती. यानंतर विराट बॅटींगमध्ये आपली फारशी चमक दाखवू शकला नव्हता. दुसऱ्या सामन्यात आपल्या अर्धशतकी खेळीदरम्यान विराटने सात चौकार आणि एक षटकार लगावला होता. त्यामुळे आगामी श्रीलंकेविरुद्ध कसोटी मालिकेत विराटच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
ind vs wi 2nd t20 : रोमहर्षक सामन्यात भारताचा विजय; टी20 मालिका खिशात
ADVERTISEMENT