टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि माजी सलामीवीर गौतम गंभीर हे दोघेही ट्रेंडिंगमध्ये आहेत. लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि दोघांमधील वादाच्या इतिहास पुन्हा समोर आला. बीसीसीआयने दोघांना सामन्याच्या मानधनावर 100 टक्के दंड आकारला. दोघांमधील वादावर वेगवेगळ्या चर्चा सुरू असताना विराट कोहलीने मौन सोडलं आहे. विराटने इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे.
ADVERTISEMENT
गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यात आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यानंतर शाब्दिक बाचाबाची झाली. आयपीएल कोड ऑपफ कंडक्ट म्हणजे आयपीएलच्या शिस्तीच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा दोघांनाही बीसीसीआयने त्यांच्या मॅच फीसमधून 100 टक्के दंड ठोठावला आहे.
गौतम गंभीरसोबत वाद झाल्यानंतर कोहली काय म्हणाला?
विराट कोहलीने गौतम गंभीरसोबत वाद झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये विराट कोहलीने म्हटलं आहे की, आपण जे काही ऐकतो ते मत असत, सत्य नाही. तसंच जे काही आपण बघतो तो एक दृष्टिकोण असतो, सत्य नसतं.”
नवीन उल हकनंतर गौतम गंभीरसोबत वाद
विराट कोहलीची ही पोस्ट आरसीबी आणि एलएसजी यांच्यातील सामन्यानंतर झालेल्या वादानंतरची आहे. विराट कोहलीचा सामना दरम्यान अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन उल हकसोबत वाद झाला होता.
हेही वाचा >> महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणारं शरद पवारांचं ‘ते’ भाषण जसंच्या तसं…
नवीन उल हक सोबत वाद झाल्यानंतर काईल मेयर्स विराट कोहलीला समजावण्यासाठी आला होता. त्याचवेळी गौतम गंभीर मेयर्सला विराट कोहलीपासून दूर घेऊन गेला. त्यानंतर विराट कोहलीही काहीतरी बोलत पुढे गेला. त्यानंतर गौतम गंभीर आणि विराट कोहलीतील वाद वाढला.
कोहली-गंभीरला शंभर टक्के दंड
सामन्यादरम्यान झालेल्या वादानंतर बीसीसीआयने विराट कोहली, काईल मेयर्स, नवीन उल हक आणि गौतम गंभीर यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला. बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीरला सामन्याच्या फीवर 100 टक्के दंड ठोठावला आहे. तर काईल मेयर्स आणि नवीन उल हकला मॅच फीसच्या 50 टक्के दंड ठोठावला आहे.
केएल राहुलकडून मध्यस्थी
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुलने वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. केएल राहुल आणि विराट कोहली बाजूला उभे राहुन बोलताना व्हिडीओत दिसत आहे. कोहली त्याला प्रकरण समजावून सांगत असल्याचं दिसत आहे. त्यावेळी नवीन उल हक त्यांच्याजवळून जातो. केएल राहुल त्याला कोहली सोबतचा वाद संपवण्यास सांगतो मात्र, नवीन त्याला नकार देताना दिसत आहे.
हेही वाचा >> शरद पवारांची घोषणा! राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार
आधीपासूनच कोहली-गंभीरमध्ये वाद
माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातील संबंध आधीपासूनच वादात आहेत. 2013 मध्ये आयपीएलदरम्यान दोघांमध्ये वाद झाला होता. सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान लखनऊने आरसीबीचा पराभव केल्यानंतर गौतम गंभीरने आरसीबीच्या चाहत्यांना तोंडावर बोट ठेवून चूप राहण्याचे हावभाव केले होते. लखनऊला पराभूत केल्यानंतर विराट कोहलीनेही असंच केलं.
ADVERTISEMENT