चेन्नईत पहिल्याच टेस्ट मॅचमध्ये पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर विराट कोहलीच्या भारतीय संघाने चेन्नईतच दुसऱ्या टेस्ट मॅचमध्ये दमदार पुनरागमन केलं आहे. इंग्लंडचा ३०० पेक्षा जास्त रन्सनी धुव्वा उडवत भारताने ४ टेस्ट मॅचच्या सिरीजमध्ये १-१ अशी बरोबरी साधली. परंतू या टेस्ट मॅचमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीचं रौद्र स्वरुप पहायला मिळालं. इंग्लंडचे माजी प्लेअर डेव्हिड लॉयड यांनी विराट कोहलीवर अहमदाबाद टेस्ट साठी बंदी घालण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
अंपायर नितीन मेनन यांनी दिलेल्या काही निर्णयांवर नाराज झालेल्या विराट कोहलीने मैदानात मेनन यांच्याशी वाद घातला. अंपायर्सची कामगिरी हा चेन्नई टेस्टमध्ये चर्चेत राहिलेला मुद्दा होता. अनेक माजी प्लेअर्सनी याविरोधात सोशल मीडियावर आपली नाराजीही बोलून दाखवली. Daily Mail मध्ये लिहीलेल्या कॉलममध्ये लॉयड यांनी विराटवर टीका केली आहे. “एखाद्या आंतरराष्ट्रीय संघाचा कॅप्टन मैदानातच अंपायर्सवर अशा पद्धतीने टीका कशी काय करु शकतो? विराटने अहमदाबाद टेस्ट खेळायला नको, त्याच्यावर पुढील ३ टेस्ट मॅचसाठी बंदी घालायला हवी.”
चेन्नई टेस्टच्या तिसऱ्या दिवशी जो रुट एलबीडब्ल्यू असल्याचं अपील भारतीय बॉलर्सनी केलं होतं. अंपायर मेनन यांनी ते फेटाळून लावलं. भारतीय संघाने याविरोधात DRS घेतल्यानंतही अंपायर्स कॉलमुळे जो रुटला जिवदान मिळालं. थर्ड अंपायरच्या याच निर्णयामुळे विराट कोहलीला राग आला आणि त्याने मैदानातच अंपायर मेनन यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. विराट कोहलीच्या या वागणुकीला अनेकांनी आक्षेप घेतला होता.
ADVERTISEMENT