Kohli ची कर्णधारपदावरुन उचलबांगडी, पहिल्यांदाच निवड समितीची बाजू आली समोर; चेतन शर्मा म्हणाले…

मुंबई तक

• 04:05 PM • 31 Dec 2021

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये संघाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी आफ्रिका दौऱ्यावर निघताना विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर पहिल्यांदाच निवड समितीने आपली बाजू समोर मांडली आहे. टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नको […]

Mumbaitak
follow google news

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन-डे मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी व्हर्चुअल प्रेस कॉन्फरन्समध्ये संघाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वी आफ्रिका दौऱ्यावर निघताना विराट कोहलीने पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ माजला होता. वन-डे संघाच्या कर्णधारपदावरुन उचलबांगडी केल्यानंतर पहिल्यांदाच निवड समितीने आपली बाजू समोर मांडली आहे.

हे वाचलं का?

टी-२० संघाचं कर्णधारपद सोडू नको अशी विनंती आम्ही विराट कोहलीला केली होती असा गौप्यस्फोट बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केला होता. परंतू विराट कोहलीने कसोटी मालिकेवर निघण्याआधी आपल्याला कोणीही कर्णधारपद न सोडण्याबद्दल सांगितलेली नसल्याचं जाहीर केलं. उलट आपल्या निर्णयाचं स्वागतच झाल्याचं कोहलीने सांगितलं होतं. निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी याबद्दल आपली बाजू स्पष्ट केली.

“विराट कोहलीचा निर्णय ऐकल्यानंतर आम्हा सर्वांनाच धक्का बसला. विराट कोहलीने अशा पद्धतीने कॅप्टन्सी सोडणं याचा स्पर्धेवर परिणाम होईल असं आम्हाला वाटलं होतं. आम्ही विराट कोहलीला हे देखील सांगितलं की विश्वचषकाची स्पर्धा संपल्यानंतर आपण याबद्दल बोलूया. विराट कोहली हा आमच्यासाठी राष्ट्रीय खजिन्यासारखा आहे. सरतेशेवटी आम्हाला भारतीय क्रिकेटचं चांगलं झालेलं हवं होतं.”

SA vs IND : लोकेश राहुलकडे वन-डे संघाचं नेतृत्व, जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर नवीन जबाबदारी

विराटला वन-डे कर्णधारपदावरुन हटवणं हा आमच्यासाठी कठोर निर्णय होता. परंतू निवड समितीला असे निर्णय घ्यावेच लागतात. त्या बैठकीत असणाऱ्या सर्वांनी विराटला निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती केली होती. परंतू विराट आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये दोन कर्णधार असणं आम्हाला योग्य वाटलं नाही म्हणूनच रोहितला वन-डे संघाचं कर्णधारपद सोपवण्यात आल्याचं चेतन शर्मा म्हणाले.

याचवेळी बोलताना चेतन शर्मा यांनी विराट कोहली आणि रोहित शर्मामधल्या कथित वादावर भाष्य केलं. “विराट आणि रोहित दोघेही चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. कोणीही अंदाजावर जाऊ नका. मी इथे बसून तुम्हाला सांगतो आहे की दोघांमधलं नातं अतिशय चांगलं असून ते योग्य दिशेने जात आहेत. माझी विनंती आहे की सर्व वाद २०२१ मध्ये सोडून देऊया. संपूर्ण संघ हा एका परिवारासारखाच आहे.”

कोहलीच नाही, तर ‘या’ दिग्गज कर्णधारांनाही BCCI ने अचानक दाखवलाय बाहेरचा रस्ता, कारण…

    follow whatsapp