१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या उर्वरित हंगामाला युएईत सुरुवात होणार आहे. या सामन्यांसाठी बीसीसीआयने मर्यादीत स्वरुपात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. १६ तारखेपासून आयपीएलच्या अधिकृत वेबसाईटवर प्रेक्षकांना तिकीटं उपलब्ध होणार आहेत.
ADVERTISEMENT
युएई सरकारचे कोरोनाचे नियम लक्षात घेऊन मर्यादीत स्वरुपात प्रेक्षकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. अबु धाबी, दुबई आणि शारजाह या तीन शहरांमध्ये आयपीएलचे सामने खेळवले जाणार आहेत. १९ सप्टेंबरला गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यातल्या सामन्याने उर्वरित हंगामाची सुरुवात होईल.
एका क्लिकवर जाणून घ्या IPL 2021 च्या उर्वरित सिझनचं Time Table
दरम्यान, आगामी हंगामापासून आयपीएलमध्ये दोन संघ वाढणार असल्याची घोषणा बीसीसीआयने याआधीच केली होती. या दोन संघांसाठी बीसीसीआयने निवीदा मागवल्या होत्या. २०२२ सालापासून आयपीएल १० संघांमध्ये खेळवलं जाणार आहे. या दोन संघाचा लिलाव १७ ऑक्टोबरला रंगण्याचे संकेत मिळत आहेत. या दोन संघांच्या लिलावातून बीसीसीआयला अंदाजे ५ हजार कोटींचा फायदा होणार आहे.
IPL 2021 : नवीन हंगामाला उरले अवघे काही दिवस, जाणून घ्या काय आहेत प्रत्येक संघासमोरची आव्हानं?
ADVERTISEMENT