रॉबिन राउंड सिस्टम काय आहे? ज्यामुळं भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येणार

मुंबई तक

• 08:38 AM • 03 Sep 2022

आशिय कपमध्ये आता उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानने हाँगकाँगचा दारूण पराभव केला, त्यामुळे आता उपांत्य फेरीमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान- श्रीलंका लढत होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार […]

Mumbaitak
follow google news

आशिय कपमध्ये आता उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत. भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका हे चार संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत. पाकिस्तानने हाँगकाँगचा दारूण पराभव केला, त्यामुळे आता उपांत्य फेरीमध्ये भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान- श्रीलंका लढत होणार आहे. 4 सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा सामना होणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की पुन्हा भारत-पाकिस्तान सामना कसा होणार? त्याचं उत्तर आहे रॉबिन राउंड सिस्टम.

हे वाचलं का?

काय आहे रॉबिन राउंड सिस्टम?

राऊंड रॉबिन सिस्टीम म्हणजे प्रत्येक संघ लीग टप्प्यात प्रत्येक संघाशी खेळतो. वर्ल्डकप 2019 च्या दृष्टीने आपण असे म्हणू शकतो की एकूण 10 संघ होते त्यामुळे प्रत्येक संघ सर्व 9 संघांसोबत एकदाच खेळला होता. क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण प्रत्येक संघ इतर सर्व संघांशी खेळणार असल्याने कोणालाही अतिरिक्त फायदा होत नाही.

या सिस्टीममध्ये ज्या संघाला कमी पॉईंट मिळतात तो संघ स्पर्धेतून बाहेर पडतो. म्हणूनच ही प्रणाली आयपीएल, बिगबॉश तसेच अनेक देशांतर्गत लीगमध्ये फॉलो केली जाते. गटात जे टॉपचे संघ आहेत ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. आशिया कपचा विचार केला तर आता भारत आणि पाकिस्तान गटात पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत म्हणून ते पुन्हा आमने-सामने आले आहेत.

आशिया कप 2022 मध्ये सुपर 4 म्हणजे काय?

आशिया कप 2022 चे दोन गट तयार करण्यात आले आहेत. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग गट अ मध्ये आहेत तर ब गटात श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश आहेत. अ गटातून: भारत आणि पाकिस्तानल उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले आहेत. ब गटातून: अफगाणिस्तान आणि श्रीलंका सुपर-4 साठी पात्र ठरले आहेत.

भारताची संभाव्य-11

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, आवेश खान.

दरम्यान भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव केला होता. पाकिस्तानने टी-20 विश्वचषकात भारताचा दारूण पराभव केला होता त्याचा बदला भारतीय संघानं घेतला आहे. पहिल्या सामन्यात रविंद्र जडेजाने चांगली कामगिरी केली होती, परंतु आता तो दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जागेवर कोणाला संधी मिळते हे पाहावं लागणार आहे. ऋषभ पंत त्याच्या जागेवर संघात येतो का हे पाहावं लागणार आहे.

    follow whatsapp