आशिया कप 2022 मध्ये भारतीय संघ पाकिस्तानशी भिडणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याकडे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. या ब्लॉकबस्टर सामन्यात स्टार फलंदाज रोहित शर्मा टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. दुसरीकडे, बाबर आझम पाकिस्तान संघाची कमान सांभाळणार आहे.
ADVERTISEMENT
भारत-पाकिस्तान यांच्यातील गेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर दोन्ही संघांमध्ये एक अतिशय मनोरंजक सामने झाले आहेत. यादरम्यान पाकिस्तानने चार वेळा नाणेफेक जिंकलं तर एका वेळी भारतीय संघाने नाणेफेक जिंकला. भारतीय संघाने तीन सामने जिंकले, तर पाकिस्तानी संघाला दोन वेळा यश मिळाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या मागील पाच सामन्यांचे निकाल जाणून घेऊया.
1. T20 विश्वचषक 2021 (पाकिस्तान जिंकला):
24 ऑक्टोबर 2021 रोजी दुबई येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा 10 गडी राखून पराभव केला . नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 20 षटकांत 7 गडी गमावून 151 धावा केल्या होत्या. त्या सामन्यात विराट कोहलीने सर्वाधिक 57 धावा काढल्या. दुसरीकडे पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन बळी घेतले.प्रत्युत्तरात बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यातील 152 धावांच्या नाबाद भागीदारीने भारताची कोंडी केली. विश्वचषकात भारताविरुद्ध पाकिस्तानी संघाचा हा पहिला विजय ठरला.
2. विश्वचषक 2019 (भारताचा विजय)
एकदिवसीय विश्वचषक 2019 च्या गट सामन्यात पाकिस्तानविरुद्ध रोहित शर्माचा धमाका पाहायला मिळाला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना रोहितने भारतीय संघासाठी अवघ्या 113 चेंडूत 140 धावांची तुफानी खेळी खेळली, ज्यात 14 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. रोहितच्या या संस्मरणीय खेळीमुळे भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात 336 धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरात 40 षटकांत 6 गडी बाद 212 धावाच करता आल्या. डकवर्थ आणि लुईस नियमानुसार भारताने तो सामना 89 धावांनी जिंकला.
3. आशिया कप 2018 (भारताचा विजय)
आशिया कप 2018 (ODI) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामने खेळले गेले. सुपर-4 टप्प्यात खेळला गेलेला सामना खूप खास होता जिथे भारताने 9 विकेट्सने विजय मिळवला. दुबईत खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने शोएब मलिकच्या 78 धावांच्या जोरावर 50 षटकात 7 बाद 237 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 63 चेंडू बाकी असताना 9 विकेट्स राखून सामना जिंकला. शिखर धवनने सर्वाधिक 114 आणि कर्णधार रोहित शर्माने नाबाद 111 धावा केल्या.
4. आशिया कप 2018 (भारताचा विजय)
आशिया कप 2018 (ODI) च्या गट सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानचा अवघ्या 162 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून बाबर आझमने 47 आणि शोएब मलिकने 43 धावा केल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. प्रत्युत्तरात भारताने हा सामना आठ गडी राखून जिंकला. रोहित शर्माने 52 आणि शिखर धवनने 46 धावांचे योगदान दिले होते.
5. चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 फायनल (पाकिस्तान जिंकला)
चॅम्पियन्स ट्रॉफी 2017 (ODI) च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्धचा पराभव चाहते विसरलेले नाहीत. त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र फखर जमानच्या 114 धावांच्या जोरावर पाकिस्तानने भारताला विजयासाठी 339 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया 30.3 षटकात 180 धावांवर ऑलआऊट झाली आणि पाकिस्तानने 180 धावांनी सामना जिंकला. हार्दिक पांड्या (76) शिवाय भारताचा एकही फलंदाज टिकू शकला नव्हता.
ADVERTISEMENT