ADVERTISEMENT
क्रिकेटपटून ऋषभ पंत सध्या अपघातातून सावरत आहे.
ऋषभ पंतने नुकताच एक रिकव्हरी व्हिडीओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो पाण्यात काठीच्या मदतीने चालत आहे.
सध्या पंत चर्चेत असण्याचं कारण एक फोटो आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने ऋषभ पंतसोबतचा हा फोटो शेअर केला आहे.
खरं तर, युवराज ऋषभ पंतला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला आणि त्याची तब्येत जाणून घेतली.
सिक्सर किंग युवीने फोटोसह पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘हा चॅम्पियन आता पुन्हा उठणार आहे.’
युवराज सिंगने पुढे लिहिलं, ‘ऋषभसोबतची भेट खूप चांगली होती. खूप मजा आली. किती सकारात्मक आणि मजेशीर व्यक्ती आहे.’
अपघातानंतर पंतच्या पायावर आणि इतर काही ठिकाणी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यातून तो हळूहळू बरा होत आहे.
ADVERTISEMENT