आयपीएलच्या चौदाव्या हंगामात चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरु यांनी प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान निश्चीत केलं आहे. सोमवारी चेन्नई विरुद्ध दिल्ली यांच्यात दुबईच्या मैदानावर सामना पार पडला. दिल्लीने या सामन्यात चेन्नईवर ३ विकेटने मात केली. दोन्ही संघांनी याआधीच प्ले-ऑफ मध्ये प्रवेश मिळवल्यामुळे हा सामना फक्त औपचारिकता म्हणून होता.
ADVERTISEMENT
परंतू या सामन्यात महेंद्रसिंह धोनीची लाडकी मुलगी झिवाने आपल्या गोड अंदाजात सर्वांचं मन जिंकून घेतलं.
स्टेडीअममध्ये आपली आई साक्षीसोबत बसलेली झिवा हात जोडून डोळे बंद करुन प्रार्थना करत असतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पिंक फ्रॉकमध्ये झिवाच्या या क्यूट अंदाजावर चेन्नई आणि धोनीच्या फॅन्सनी आपली पसंती दर्शवली आहे.
झिवाने स्टँडमध्ये बसून केलेली प्रार्थना दुर्दैवाने देवाने ऐकली नाही असं म्हणावं लागेल. कारण पहिल्यांदा बॅटींग करताना चेन्नईचा संघ १३६ धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनीही या सामन्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने १८ रन्स केल्या परंतू यासाठी २७ बॉल खर्च केले ज्यात त्याने एकही चौकार आणि षटकार लगावला नाही. प्रत्युत्तरादाखल दिल्लीने चेन्नईचं हे आव्हान अटीतटीच्या लढतीत ३ विकेट राखत परतवून लावलं.
ADVERTISEMENT