Vastu Tips: वास्तुचा चमत्कार अन् तुमचं करियर जाईल टॉपवर!

मुंबई तक

Vastu Tips and Career: वास्तुशास्त्र आणि करियर यांचा फार जवळचा संबंध आहे. वास्तुशास्त्रातील तत्त्वे आणि त्यांचा करियरवर होणारा प्रभाव याबाबत सविस्तरपणे जाणून घ्या.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य: ChatGPT (AI)
फोटो सौजन्य: ChatGPT (AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वास्तुशास्त्र आणि करिअर या परस्परसंबंधी गोष्टी

point

जाणून घ्या वास्तूशास्त्रातील काही महत्त्वाच्या गोष्टी

point

वास्तूशास्त्र हे करिअरवर परिणाम कसं करतं?

Vastu Tips: करिअरमध्ये अनेकांना अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या करियरची प्रगती थांबते. तुमच्या वरिष्ठांना तुमच्या कामात काहीतरी कमतरता जाणवते. अनेकदा प्रयत्न करूनही तुम्हाला करिअरमध्ये हव्या त्या टप्प्यावर पोहचता येत नाही. पण यामागे काही वास्तू दोषही असण्याची शक्यता असते. ज्यामुळे तुमच्या करिअरवर नकारात्मक परिणाम होत असतो. 

घराची रचना आणि आपलं यश यांचा खूप जवळचा संबंध असतो.  वास्तुशास्त्राच्या जाणकार याबाबत नेहमीच महत्त्वाचे सल्ले देतात.  करिअर आणि संपत्ती यांचा संबंध घराच्या ईशान्य दिशेशी (उत्तर-पूर्व) असतो. तिथे काही दोष असल्यास तर आपल्या प्रगतीत अडथळे येऊ शकतात.

हे ही वाचा>> नोकरीत तुमची प्रगती नाही? आठवड्यातून एकदा करा 'हा' खास उपाय

ईशान्य दिशेला जर जड वस्तू ठेवलेलं असेल तर त्याचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होतो. ईशान्य दिशा ही सकारात्मक ऊर्जेचं केंद्र आहे. इथे जड वस्तू किंवा कचरा असल्यास करियरमधील संधींवर परिणाम होतो. त्यामुळे ईशान्य दिशेकडील जड वस्तू या दक्षिण दिशेला ठेवणं जास्त उचित ठरेल. 

तसेच तुमच्या कामाचं टेबल हे उत्तरेकडे असणं गरजेचं आहे. तसंच तिथे एक छोटं पाण्याचं झरं ठेवावं. कारण पाणी हे समृद्धीचं प्रतीक आहे. त्यामुळे तुम्ही कामाच्या टेबलावर टेबलटॉप फाऊंटनही ठेवू शकता.

हे ही वाचा>> IIT बाबाकडे सापडला गांजा! पोलिसांनी अटक करताच म्हणाला 'महाकुंभचा प्रसाद', नेमकं घडलं तरी काय?

या गोष्टी केल्यास काही दिवसांतच तुम्हाला बदल जाणवू लागेल. यामुळे तुमच्या करियरला एक गती येईल आणि तुम्हाला बराच फायदाही होऊ शकतो.

वास्तुशास्त्र हे ऊर्जेचं विज्ञान आहे. जेव्हा आपण आपल्या सभोवतालचं वातावरण संतुलित करतो, तेव्हा आपल्या आयुष्यातही संतुलन येतं.

वास्तू टिप्स:

  1. ईशान्य दिशा (उत्तर-पूर्व): ही दिशा करियर आणि संधींसाठी महत्त्वाची मानली जाते. ती स्वच्छ आणि मोकळी ठेवा.
  2. उत्तर दिशा: कामाच्या जागेच्या टेबलाचं तोंड उत्तरेकडे असल्यास एकाग्रता आणि यश वाढतं असं मानलं जातं.
  3. पाण्याचं तत्त्व: घरात किंवा ऑफिसमध्ये ईशान्य दिशेला पाण्याचं छोटं झरं किंवा फिश टँक ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते.

हे वाचलं का?

    follow whatsapp