New Delhi CM Atishi : मोठी बातमी! दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी अतिशी, अरविंद केजरीवाल यांनी केली घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Atishi Delhi New Chief Minister
Atishi Delhi New Chief Minister
social share
google news
  • 12:21 PM • 17 Sep 2024

    Delhi New CM Atishi : अतिशी यांच्या खांद्यावर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा

    राजधानी दिल्लीतून मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्रीपदावर अतिशी यांची वर्णी लागली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांना दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी दिली आहे. आपच्या नेत्यांनी अतिशी यांची विधिमंडळ नेतेपदी नियुत्ती केली. दिल्लीच्या कथित मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल तुरुंगात होते. केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे या पदावर कोणत्या नेत्याला संधी मिळणार, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लढवण्यात आले होते. आज 12 वाजता आम आदमी पार्टाच्या विधिमंडळातील नवीन नेत्यांसह मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. 
     

  • 09:16 AM • 17 Sep 2024

    मनोज जरांगे मागणीवर ठाम, राज्य सरकार लवकरात लवकर...अब्दुल सत्तार काय म्हणाले? 

    Abdul Sattar Latest News : आज गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे, तो गोड करायचा आहे, इथे राजकीय भाषा करायची नाही, असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर बोलण टाळलं. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी मी राजकीय भाषेत बरोबर माहिती देईल, असं सत्तार म्हणाले. मनोज जरांगे त्यांच्या मागणीवर ठाम आहेत. मराठा आरक्षणावर राज्य सरकार लवकरात लवकर निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया अल्पसंख्यांक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलीय. आज जालना गणेश फेस्टिवल निमित्ताने मंत्री अब्दुल सत्तार हे जालन्यात आले होते. यावेळी सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. आज गणेश उत्सवाचा शेवटचा दिवस आहे, तो गोड करायचा आहे, इथे राजकीय भाषा करायची नाही असं म्हणत मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांच्या प्रश्नावर बोलणे टाळलं. ज्यावेळी गरज पडेल त्यावेळेस मी बरोबर राजकीय भाषेत माहिती देईल, असं म्हणत सत्तार यांनी भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना म्हटलंय.

  • 09:04 AM • 17 Sep 2024

    Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आमरण उपोषण सुरु, सरकारला दिला मोठा इशारा

    Manoj Jarange Latest News Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणला मध्यरात्री 12 वाजेपासून पुन्हा एकदा सुरूवात झालीय. ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून त्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचे औचित्य साधून जरांगे आमरण उपोषणाला बसलेत. मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीत हे सहावे आमरण उपोषण असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तो पर्यंत मागे न हटण्याचा ठाम निर्धार जरांगे यांनी केलाय. फडणवीस यांना ही संधी दिली असून पुन्हा मला दोष देऊ नका, आरक्षण न दिल्यास गुडघे टेकायला लावू असा इशारा देखील जरांगे यांनी उपोषणाला बसल्यानंतर सरकारला दिलाय. 

follow whatsapp

ADVERTISEMENT