मुंबई पुन्हा हादरली! 20 वर्षीय तरुणीवर धावत्या लोकल ट्रेनमध्ये बलात्कार
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये एका 20 वर्षीय तरूणीवर महिलांच्याच डब्यात शिरून एका 40 वर्षीय व्यक्तीने लैगिक अत्याचार केल्याची दुदैवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानका दरम्यान ही घटना घड़ली होती.
ADVERTISEMENT
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये (Mumbai local) एका 20 वर्षीय तरूणीवर महिलांच्याच डब्यात शिरून एका 40 वर्षीय व्यक्तीने लैगिक अत्याचार केल्याची दुदैवी घटना घडली आहे. बुधवारी सकाळी 7 वाजून 26 मिनिटांनी मस्जिद बंदर आणि सीएसएमटी स्थानका दरम्यान ही घटना घड़ली होती. या घटनेनंतर तरूणीने आरपीएफकडे (RPF) तक्रार दाखल केली होती. या घटनेच्या 8 तासानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान याआधी मुंबईतील चर्चगेट येथील वस्तीगृहात एका विद्यार्थीनीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. तर मीरारोडमध्ये देखील एका लिव्ह इन पार्टनरचे तूकडे तूकडे करून ते मिक्सरला लावून त्याचा विल्हेवाट लावल्याची घटना समोर आली होती. या सततच्या घटनेनंतर महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (a 20-year-old girl was raped in mumbai local the accused was arrested after eight hours)
ADVERTISEMENT
घटनाक्रम काय
मीडिया रिपोर्टनुसार मुंबईच्या गिरगावची रहिवासी असलेली पिडीत तरूणी परीक्षेसाठी नवी मुंबईच्या बेलापुरच्या दिशेने जात होती. यासाठी तिने लोकल पकडली होती. या लोकलमधील महिलांच्य़ा डब्ब्यात ती एकटीच चढली होती. आरपीएफ देखील या डब्ब्यात नव्हते. याचाच फायदा घेत, आरोपीने महिलांच्या डब्यात प्रवेश करून तरूणीसोबत लैगिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या या कृत्याला तिने विरोध करत आरडाओरड देखील केली. यानंतर पुढच्याच स्टेशनवर आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर पीडित तरूणी ट्रेनमधून उतरून पुरूषांच्या डब्यात शिरली होती.
तरूणी घाबरलेल्या अवस्थेत पाहून पुरूष प्रवाशांनी तिची विचारपूस केली. यावेळी तरूणीने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. यानंतर पुरूष प्रवाशांनी पोलिसांकडे तक्रार केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी आठ तासात आरोपीला अटक केली होती. आरोपीवर बलात्काराच्या आरोपासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
हे वाचलं का?
लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना अतिशय संतापजनक आहे. यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलमध्येम महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला असल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. तसेच महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता कारणीभूत असल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांवर केली आहे. तसेच या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
संतापजनक!
चालू लोकलमध्ये महिलांच्या डब्यात चढून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केल्याची घटना घडली. ही अतिशय संतापजनक घटना आहे.यामुळे पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे. महाराष्ट्रात गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिलेली नसून याला गृहखात्याची निष्क्रियता…— Supriya Sule (@supriya_sule) June 15, 2023
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी देखील या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.मुंबईत लोकल ट्रेनमध्ये एका व्यक्तीने महिलांच्या डब्यात जाऊन एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना अत्यंत संतापजनक आणि घृणास्पद असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले आहे. तसेच या घटनेमुळे सार्वजनिक वाहतूकीतील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात तपास यंत्रणांनी आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ADVERTISEMENT
The incident of a person getting into the women’s compartment and sexually assaulting a young woman in a moving local train in Mumbai is a very disturbing and heinous act. The issue of women’s safety in public transport has come up once again. The investigating agencies must take…
— Praful Patel (@praful_patel) June 15, 2023
मुंबईत चालत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या लैंगिक अत्याचारची घटना अतिशय गंभीर आहे. सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे मुंबईत महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले आहेत. तसेच राज्यभरात होत असलेल्या अशा विविध गुन्ह्यांवर सरकार मूग गिळून बसली आहे, अशी टीका देखील जयंत पाटील यांनी सरकारवर केली आहे. सरकारची अशी असंवेदनशील मानसिकता रुजू पाहतेय हे राज्याचे दुर्दैव असल्याचेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईत चालत्या लोकलमध्ये विद्यार्थीनीवर झालेल्या लैंगिक अत्याचारची घटना अतिशय गंभीर आहे. सातत्याने होत असलेल्या अशा घटनांमुळे मुंबई शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरात होत असलेल्या विविध गुन्ह्यांवर सरकार मूग गिळून बसले आहे. सरकारची अशी असंवेदनशील मानसिकता रुजू…
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 15, 2023
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT