अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार, शरद पवार काय करणार?
शरद पवार कराडचा दौरा करुन आता मुंबईत आले आहेत. अमोल कोल्हे त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते त्यांच्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे त्यानी एका वृत्तपत्राशी बोलताना जाहीर केले.
ADVERTISEMENT
Amol Kolhe : अजित पवारांच्या शपथविधीला उपस्थित असणाऱ्या खासदार अमोल कोल्हे यांनी २४ तासांत यु टर्न घेतला. आपण पवार साहेबांसोबतच असल्याचं त्यांनी ट्विट करत जाहीर केलं. ‘आपण अजित पवारांकडे एका वेगळ्या कामासाठी गेलो होतो. तेथे गेल्यावर भाजपसोबत जावं लागणार असल्याचं कानावर आलं, मात्र लगेचच शपथविधी होईल असं माहित नव्हतं’ अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली होती. त्याचबरोबर ते शरद पवारांची भेट घेणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं.
ADVERTISEMENT
शरद पवार कराडचा दौरा करुन आता मुंबईत आले आहेत. अमोल कोल्हे त्यांची भेट घेणार आहेत. या भेटीत ते त्यांच्या खासदारकीचा राजीनामा शरद पवारांकडे देणार असल्याचे त्यानी एका वृत्तपत्राशी बोलताना जाहीर केले. त्यामुळे शरद पवार त्यांचा राजीनामा स्विकारतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
वाचा >> Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट, फायदा होणार काँग्रेसला
रविवारी अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला राष्ट्रवादीचे अनेक आमदार कार्यकर्ते हजर होते. यावेळी या सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे देखील उपस्थित असल्याचे दिसून आले होते. त्याचबरोबर कोल्हे भाजपच्या नेत्यांसोबत गप्पा मारत असल्याचे देखील अनेक व्हिडीओ मधून समोर आलं होतं.
हे वाचलं का?
शपथविधीनंतर दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे यांनी ट्विट करत ते शरद पवार यांच्यासोबत असल्याचं जाहीर केलं. आतला आवाज ऐकून शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. “जेव्हा शपथविधी कार्यक्रमला राजभवनात गेलो तेव्हाच मी माझ्या कार्यालयाला माझा राजीनामा तयार ठेवण्यास सांगितलं होतं, कारण मी मतदारांचा विश्वास तोडण्यासाठी राजकारणात आलेलो नाही. शिरुर मतदारसंघातील मतदारांनी मला निवडून देताना एका विचारधारेवर विश्वास ठेवला आहे”, असं देखील कोल्हे यावेळी म्हणाले.
वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?
त्यामुळे शरद पवार आणि अमोल कोल्हेंच्या भेटीत नेमकं काय होतं, अजित पवारांसोबत गेलेले आमदार पुन्हा पवारांकडे येणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT