सुप्रिया सुळे भडकल्या! मोदींच्या मंत्र्याचा संसदेतच करणार ‘करेक्ट कार्यक्रम’
बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात असणाऱ्या शेळगावमध्ये बोलताना सुप्रिया सुळे भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह यांच्यावर चांगल्याच भडकल्या.
ADVERTISEMENT
Supriya Sule news : ‘महाराष्ट्रात येऊन मिजास नाही, दाखवायची, तुझा कार्यक्रम पार्लमेंटमध्येच करते म्हणजे सगळ्या देशाला कळेल की तू किती पाण्यात आहे.’ हे विधान आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांचं. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर तालुक्यात असणाऱ्या शेळगावमध्ये बोलताना सुप्रिया सुळे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यावर चांगल्याच भडकल्या. नेमकं काय झालं हेच समजून घ्या… (Maharashtra Politics Latest News : Supriya Sule warns union minister Prahlad Singh)
ADVERTISEMENT
भाजपच्या ‘मिशन 144’मध्ये सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यापासून भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचे दौरे बारामती लोकसभा मतदारसंघात वाढले आहेत.
गेल्या आठवड्यात भाजपच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत प्रल्हाद सिंह पटेल बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील उदमाईवाडी येथे राष्ट्रीय जल जीवन मिशन योजनेचे उद्घाटन पार पडले. या कार्यक्रमाला विरोधी पक्षाच्या खासदार आणि आमदारांना निमंत्रण दिले गेले नाही. त्यावरूनच सुप्रिया सुळेंनी संताप व्यक्त केला.
हेही वाचा >> लोकप्रियतेचा मुद्दा वगळला, फडणवीस झळकले! शिवसेनेकडून ‘डॅमेज कंट्रोल’
‘या योजनेला केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारकडूनही निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे जलजीवन मिशनच्या कार्यक्रमांना स्थानिक खासदार आणि आमदारांना बोलण्याचा प्रोटोकॉल आहे. मात्र, आम्हाला याबाबतचे निरोपच नाहीत’, असा आरोप करत खासदार सुप्रिया सुळे चांगल्याच भडकल्या. प्रल्हाद सिंह पटेल यांना याबाबत विचारले असता त्यांनीही ‘उडते उडते खबर पहुंची होगी’ असं म्हणत या प्रश्नावर उत्तर देणे टाळलं होतं.
‘तुम्हारे घर मे आके हल्ला करुंगी’, सुप्रिया सुळेंनी दिला इशारा
बारामती लोकसभा मतदारसंघातील गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने इंदापूर तालुक्यातील शेळगावमध्ये सुप्रिया सुळेंनी ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी हा मुद्दा अधोरेखित केला. “पत्रकारांनी मला विचारलं की, मंत्री आले होते, त्यांना प्रश्न विचारला की, सुप्रिया सुळेंना का बोलावलं नाही? तर ते म्हणाले, उडते उडते खबर पहुंची होगी. उडते उडते… तुम्ही चेष्टा करताय का? तुम्ही बाहेरून महाराष्ट्रात येणार आणि आमची चेष्टा करून जाणार. हे नाही चालणार.”
ADVERTISEMENT
समजून घ्या >> Lok Sabha Election : भाजपचा ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे कसा गेला? इतिहास काय?
“आता पार्लमेंटमध्ये जेव्हा त्यांचा (प्रल्हाद पटेल) प्रश्न लागेल ना? तेव्हा करेक्ट कार्यक्रम दिल्लीतच करते, त्या मंत्र्याचा. इकडे येऊन मिजास नाही दाखवायची. ‘मेरे आंगन में नही, हल्ला करूंगी तो तुम्हारे घर मे आके करूंगी.’ इथे नाही करणार. मग म्हणतील काय तुमच्याकडे बोलावलं… इथे मानसन्मान. तुझा कार्यक्रम मी पार्लमेंटमध्ये करते म्हणजे देशाला कळेल की तू किती पाण्यात आहेस. इथे येऊन चिखल केलास, आता पार्लमेंटमध्ये दाखवते बरोबर. कारण तिथे ते खूप चुका करतात. आपण आपलं मानसन्मान वयाचा ठेवतो म्हणून करणार. पण, इथून पुढे ठेवणार नाही. आम्ही तुमच्यासारखं उडते उडते नाही करणार. बघा आता पार्लमेंटमध्ये काय होतं? मी व्हिडीओ पाठवेन तुम्हाला”, असा थेट इशारा सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना दिला.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT