Ganpati 2023: चाकरमान्यानू बाप्पा पावले.. शिंदे सरकारने घेतला मोठा निर्णय!

रोहित गोळे

ADVERTISEMENT

cm eknath shinde has taken a major decision to waive toll to ganesha devotees going to konkan ganpati 2023
cm eknath shinde has taken a major decision to waive toll to ganesha devotees going to konkan ganpati 2023
social share
google news

Waive toll to Ganesha devotees in Konkan: मुंबई : गणेशोत्सवासाठी (Ganeshostav) कोकणात (Konkan) जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत पथकर (Toll) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. मुंबई–बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग यावरील आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू असणार आहे.

ADVERTISEMENT

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अन्य सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते, त्यानुसार आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे.

टोलमाफीचा पास नेमका कुठे मिळेल?

या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023, कोकण दर्शन’अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौकी व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Lalbaugcha Raja 2023: लालबागच्या राजाची पहिली झलक, फक्त मुंबई Tak वर

पोलीस व परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.

हे ही वाचा >> निवडणूक आयुक्तांचे अधिकारच काढून घेणार?, मोदी सरकारच्या मनात तरी काय?

मागील काही वर्षांपासून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी ही सुविधा दरवर्षी दिली जात आहे. त्याच प्रकारचा निर्णय यंदाही सरकारच्या वतीने घेण्यात आला आहे. त्यामुळे गणपतीसाठी मोठ्या संख्येने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना यंदाही मोठा दिलासा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT