Manoj Jarange : ‘लावलं रताळू आली केळी’, जरांगेंवर गुणरत्न सदावर्तेंचा वार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maratha Reservation Kunbi certificate : adv gunratna sadavarte hits out at manoj jarange patil
Maratha Reservation Kunbi certificate : adv gunratna sadavarte hits out at manoj jarange patil
social share
google news

Gunaratna Sadavarte Manoj Jarange Patil : राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक एकवटताना दिसत आहे. यातच आता गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटलांवर हल्ला चढवला आहे. ‘जरांगे सर्व भाषणात स्वतःला मराठा म्हणतो आणि आरक्षण कुणबी म्हणून मागतो’, असं म्हणत सदावर्तेंनी घेरलं आहे. (Gunaratna Sadavarte attacked on Manoj Jarange Patil over the Maratha Reservation)

ADVERTISEMENT

गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंबद्दल बोलताना म्हणाले, “मनोज जरांगे म्हणतो मराठ्यांना वेगळ्या प्रवर्गातून आरक्षण द्या. नंतर म्हणतो कुणबी करा, ओबीसीतून आरक्षण द्या. अरे बाबा स्वतःला सर्व भाषणात मराठा म्हणतो आणि आरक्षण कुणबीतून. मी शेतकरी आहे. मला शेतमजुरांची भाषा कळते. सगळ्या जाती-धर्माची भाषा मला कळते. लावलं रताळू आली केळी असं कधीच झालं नाही. वस्तुस्थिती समजली पाहिजे.”

इथेच ओबीसीतून आरक्षण फेल झालं -सदावर्ते

सदावर्ते पुढे म्हणाले की, “जरांगे एका बाजूला मराठा म्हणतो. इथेच कुणबी म्हणून ओबीसीचं फेल झालं. तुमच्याच बोलण्यातून फेल झालं. मला पुढे जाऊन हे सांगायचं की, मग्रुरी आणि घमंडाची भाषा ही केवळ सुपरमसीमध्ये पाहायला मिळते. सुपरमसी म्हणजे काय तर आरक्षण देता येत नाही”, असं म्हणत सदावर्तेंनी जरांगेंना घेरलं आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा >> समाजासाठी विकली जमीन, हॉटेलात केलं काम; कोण आहेत मनोज जरांगे?

“जरांगेंनी राजकारणी लोकांची नावे घेऊन जरांगेचे जे पॉलिटिकल बॉसेस आहेत, त्यांना आज लॉयल असल्याचे दाखवून दिले आहे की तो किती प्रामाणिक आहे. त्यामुळे बिनबुडाच्या आणि रानभूल लागलेल्या जरांगेवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी, जनतेने, मराठा समाजाने, युवकांनी कोणतंही लक्ष देऊ नये. कारण जरांगेला हेच माहिती नाही की, त्याला मराठा म्हणून उभं राहायचं आहे की, कुणबी म्हणून. सरमिसळ आहे. त्यामुळे जरांगेच्या चर्चेला काहीही अर्थ नाही”, अशी टीका सदावर्तेंनी मनोज जरांगेंवर केली आहे.

हेही वाचा >> Maratha Reservation : मनोज जरांगेंनी निर्णयाची केली पोलखोल, शिंदे सरकार काय करणार?

“मराठा युवकांनी जरांगेंच्या नादाला लागू नये”

“जरांगे जवळ जाल, तर ज्या प्रकारे शरद पवारांच्या काळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला नाव द्या असं चाललं. अनेक वर्ष चाललं. अनेक पिढ्यांवर गुन्हे दाखल झाले. त्याचप्रकारे नामांतर झालंच नाही, नामविस्तार झाला. शरद पवारांचं ते राजकारण होतं, हे मी ठामपणे डंके की चोट पे सांगतो. त्याचप्रमाणे मराठा युवकांनो जरांगेच्या नादाला लागू नका”, असं सदावर्तेंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT