जेष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं निधन; 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. आज (25ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
ADVERTISEMENT
Baba Maharaj Satarkar Death News : ज्येष्ठ कीर्तनकार, निरुपणकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar Death) यांचे निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. आज (25ऑक्टोबर) दुपारी तीन वाजता नवी मुंबईतील नेरुळ येथील विठ्ठल जिमखाना मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे. तसंच, शुक्रवारी (26 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर नेरुळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. (Kirtankar Baba Maharaj Satarkar passed away He took his last breath at the age of 89)
ADVERTISEMENT
जेष्ठ निरुपणकार बाबा महाराज सातारकर यांनी कीर्तनाच्या माध्यमातून जनसामान्यांचं प्रबोधन करण्याचं काम केलं. गुरुवारी (25 ऑक्टोबर) त्यांनी वयाच्या ८९व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा महाराज यांच्या निधनाने वारकरी सांप्रदायावर शोककळा पसरली आहे.
वाचा: Manoj Jarange : ‘जरांगेला अटक करा, मुसक्या…’, सदावर्ते फडणवीसांचं नाव घेऊन काय बोलले?
मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पत्नी रूक्मिणी सातारकर म्हणजेच माई सातारकर यांचं निधन झालं होतं. त्यांच्या निधनाला 8 महिने होत नाही तोच बाबा महाराज सातारकर यांचीही प्राणज्योत मालवली. बाबा महाराज सातारकर यांनी अध्यात्मिक क्षेत्रात सक्रिय योगदान दिले. त्यांनी जनसेवा करण्यासाठी चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेचीही स्थापना केली. या माध्यमातून भाविकांना वैद्यकीय सुविधाही पुरवण्यात येते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
बाबा महाराजांचा जीवन परिचय
नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे उर्फ ज्येष्ठ कीर्तनकार बाबा महाराज सातारकरांच्या घरात गेल्या तीन पिढ्यांपासून कीर्तनाची आणि प्रवचनाची परंपरा जोपासली जातेय. बाबा महाराजांनी हीच परंपरा पुढे सुरू ठेवली. बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादामहाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पामहाराज आणि अण्णामहाराज यांच्याकडून बाबा महाराज सातारकरांनी परमार्थाचे धडे घेतले. बाबा महाराजांनी इंग्रजी माध्यमातून एस. एस. सी. पर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज श्री सद्गुरू दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायचे. तिथूनच त्यांवर कीर्तनाचे संस्कार रुजत गेले. वयाच्या अकराव्या वर्षांपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडेही घेतले आहेत.
वाचा: Alibaug Crime : आईवर कोयत्याने वार, अंगणात जिवंत जाळलं; उच्चशिक्षित तरूणाचं राक्षसी कृत्य
शेकडो वर्षांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा
बाबा महाराज सातारकर यांचा जन्म 5 फेब्रुवारी 1936 रोजी साताऱ्यात झाला. त्यांनी त्या काळी दहावीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून घेतलं. गेल्या काही दिवसांपासून त्यांना कीर्तनासाठी उभं राहता येत नव्हतं, त्यामुळे त्यांचे नातू ही परंपरा पुढे चालवत आहेत.
ADVERTISEMENT
वाचा : Manoj Jarange : “आम्हाला नाटक…”, सदावर्तेंच्या गाड्या फोडल्यानंतर जरांगे संतापले
बाबा महाराज सातारकर यांनी १९८३ पासून संतांच्या गावी दरवर्षी कीर्तन सप्ताह आयोजन करण्याची परंपरा सुरू केली. यात त्यांनी भंडारा डोंगर, देहू, त्र्यंबकेश्वर, नेवासे, पैठण, पंढरपूर, पिंपळनेर आदी ठिकाणी कीर्तन सप्ताहांचे आयोजन केले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT