लालबागच्या राजाच्या पायावर छत्रपतींच्या ‘राजमुद्रा’ने वाद! संभाजीराजे भडकले
लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली होती. ही बाब शिवप्रेमींना खटकली आहे, त्यामुळे त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे लालबागचा राजा गणपती मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
मुंबईतला सर्वात लोकप्रिय गणपती अशी ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या गणपतीचे नुकतेच मुखदर्शन पार पडलं होतं. या मुखदर्शनानंतर सोशल मीडियावर लालबागच्या राजाचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर आता एक मोठा वाद पेटला आहे. लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली होती. ही बाब शिवप्रेमींना खटकली आहे, त्यामुळे त्यांनी आता मुंबई पोलीस आयुक्तांकडे लालबागचा राजा गणपती मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या सर्व प्रकरणावर छत्रपती संभाजीराजे यांनी देखील सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. (lalbaugacha raja mandal insulted rajmudra chhatrapati shivaji maharaj sambhaji raje reaction)
ADVERTISEMENT
संभाजीराजे काय म्हणाले?
लालबागच्या राजाच्या चरणांपाशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची प्रतिमा साकारण्यात आली होती. राजमुद्रेची ही प्रतिमा चरणांपाशी साकारण्यात आल्याची बाब शिवप्रेमींना खटकली आहे. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या संपूर्ण वादावर आता छत्रपती संभाजीराजे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.लालबागचा राजा मंडळाने जे केले आहे, ते आज सकाळीच माझ्यावर कानावर आलं आहे. इतक्या मोठ्या गणपती मंडळाने असे बारकावे नेहमी पाहणे गरजेचे आहे, असे संभाजीराजे म्हणाले आहेत.
लालबागच्या राजाच्या मंडळाने अशी कुठलीही गोष्ट करू नये ज्यामुळे सर्वांच्या भावना दुखावल्या जातील. तसेच जर मंडळाने दुरूस्ती केली असेल तर हा विषय संपवुया असं मला वाटतं, असे देखील संभाजी राजे म्हणालेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Zareen Khan : प्रसिद्ध अभिनेत्रीला होणार अटक…, नेमकं प्रकरण काय?
मंडळाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
मराठा क्रांती महामोर्चाचे अमोल जाधवराव यांनी मुंबईतील लालबागचा राजा मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायावर दाखवण्यामागील मंडळाचा नेमका हेतू काय होता, हे आम्हा शिव अनुयायांना कळत नाही. परतू त्यांनी शिवराजमुद्रा लालबागच्या राजाच्या पायी छापून संपूर्ण शिव अनुयायांचा अवमान केला आहे.
ADVERTISEMENT
लालबागचा राजा (गणपती बाप्पा) देव जरी असले तरी आज छत्रपती शिवाजी महाराजांमुळे देव देव्हाऱ्यात आहेत. ही राजमुद्रा पायावर असणे मनाला पटत नाही. आपल्या स्वराज्याची राजमुद्रा मस्तकी लावावीस पण, पायावर पाहायला मिळत आहे याची खंत वाटत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तांनी कृपया संबंधित गोष्टीची खात्री करून लालबागचा राजा मित्र मंडळावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी मराठा क्रांती महामोर्चाकडे केली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Mumbai-Goa Highway : ‘चमकोमॅन’ वर भरोसा ठेवणार का..?, मनसेने भाजप नेत्याला डिवचले
ADVERTISEMENT