Maratha Reservation : ‘मराठ्यांची पोरं मोठी होऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचं षडयंत्र’- मनोज जरांगे पाटील
मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शंभर टक्के षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
ADVERTISEMENT
Manoj Jarange Patil protest Antarwali Sarati maratha reservation : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. असे असताना आता पुन्हा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महायुती सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मराठ्यांची पोर मोठी होऊ नयेत, त्यांचं करिअर उद्ध्वस्त करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर केला आहे. सरकार 100 टक्के मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील अशी आशा होती, पण त्यांना गोरगरीबांची गरज उरली नसल्याचीही टीका जरांगे पाटलांनी केली आहे. (manoj jarange patil criticize cm eknath shinde devendra fadnavis maratha reservation)
ADVERTISEMENT
सरकारला 40 दिवसांची मुदत देऊनही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटलांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, त्यांची पोरं मोठी होऊ द्यायची नाही असे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे शंभर टक्के षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : Beed : ‘मुलगी दे नाहीतर कुटुंबच संपवेन’, भोंदू बाबाने गुप्तधानासाठी…
जरांगे पाटील यांनी यावेळी या षडयंत्रामागचं कारण देखील सांगितलं. सरकारने 30 दिवसाचा वेळ मागितला, आम्ही 40 दिवसाचा दिला. या 30 दिवसात 5000 पुरावे मिळाले होते. एकही पुरावा जरी मिळाला तरीही कायदा पारीत करता येतो. बाकीच्यांना पुरावा नसतानाही कायदे पारीत करून प्रमाणपत्र दिलेत. त्यामुळे सरकारला पुरावे आणि वेळही दिला. तरीही प्रमाणपत्र का दिली नाही? मराठा तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरावे असूनही आरक्षण दिले जात नाहीये असे यांच्यात ठरल्याचा आरोपही जरांगे पाटलांनी केला.
हे वाचलं का?
पंजाबराव देशमुखांनी ज्या आधारावर विदर्भातील मराठ्यांनी कुणबी प्रमाणपत्र दिले होते. त्याच आधारावर कुणबी प्रमाणपत्र देता येईल.पहिले 5 हजार आणि नंतर 5 हजार पुरावे, असे साधारण 10 हजार पानांचे पुरावा सादर करूनही मराठा समाजाला कुणबीमध्ये समावेश का करत नाही ? मराठा तरूणांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरावे असूनही आरक्षण दिले जात नाही. त्यामुळे आता आम्हाला सरळ दिसतंय 10 वर्ष जरी लागले तरी अहवाल तयार होणार नाही, ते सांगतील आणखील वेळ कमी पडेल. त्यामुळे सरकारला वेळ देऊन फसवणूक झाल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.
हे ही वाचा : Crime News: क्रूरतेचा कळस! कुत्र्यासोबत अमानुष कृत्य करत तिसऱ्या मजल्यावरून फेकलं
मराठा समाजाला आवाहन
मनोज जरांगे पाटलांनी यावेळी मराठा समाजाला आवाहन देखील केले. आजपासून ऐकानेही आत्महत्या करायची नाही, आता शांततेत लढून आरक्षण मिळवायचं. अजिबात कुणीही आत्महत्या करून मरायचं नाही. तुम्ही मेला तर माझ्यासोबत कोण लढणार, उद्यापासुन एकाने आत्महत्या करायची नाही, माझ्या खांद्याला खांदा लावून लढायचं, असे आवाहन जरांगे पाटलांनी मराठा तरूणांना केले.तसेच तुम्ही दोन चार दिवसात नाही दिले तरी आम्ही आरक्षण घेणारचं, तुम्ही कसे देत नाही आम्ही बघतो, असा दमच जरांगे पाटलांनी यावेळी भरला.
ADVERTISEMENT
मोदींना गरीबांची गरज उरली नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत आल्यावर मराठा आरक्षणाचा विषय हाताळतील असे वाटले होते. पंतप्रधान जाणून बुजुन बोलले नाहीत अशी शंका असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच मराठ्यांची मोदींविषयी वाईट भावना नव्हती. जर वाईट भावना असती तर पंतप्रधान मोदींचे विमान देखील शिर्डीत उतरून दिले नसते, असे जरांगे पाटील म्हणाले. पंतप्रधानांनी मराठ्यांची निराशा केली आहे, आता त्यांना गोरगरीबांची गरज उरली नसल्याची टीका जरांगे पाटलांनी केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT