Maratha Reservation: जरांगे पाटलांनी सरकारला ठणकावून सांगितलं ‘मुंबईत गोळ्या झेलण्यास…’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil warned government that he is ready to face bullets in Mumbai Maratha reservation cm eknath shinde dcm devendra fadnavis ajit pawar
Manoj Jarange Patil warned government that he is ready to face bullets in Mumbai Maratha reservation cm eknath shinde dcm devendra fadnavis ajit pawar
social share
google news

Maratha Reservation : या सरकारला वर्षभर वेळ देऊनही त्यांनी मराठा आरक्षणावर कोणताही तोडगा काढला नाही. वेगळ्या मार्गाने आरक्षण देणार होते, मात्र तेही त्यांनी दिले नाही, मग आता दोन दिवसात आरक्षण कसं देणार असा सवाल मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी केला आहे. यावेळी त्यांनी सरकारवर टीका करताना मला मराठा आरक्षणाला (Reservation) विरोध करणाऱ्या मंत्र्यांचे नावं जाहीर करायला लावू नका असा इशाराही त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. आरक्षणावर सरकारने काहीच केले नसल्यामुळे आता मराठ्यांनी 20 तारखेला अंतरवाली सराटीत यावं आणि मुंबईकडे निघायचं असल्याचेही त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे.

ADVERTISEMENT

मंत्र्यांना बघून घेऊ

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी सरकावर टीका करताना कोण मंत्री विरोध करत आहेत, त्यांची नावं आता जाहीर करायला लावू नका. नाही तर तुमचा सुफडासाफ झालाच म्हणून समजा असा थेट इशाराच त्यांनी सरकारला दिला आहे. यावेळी मराठा बांधवांना त्यांनी आवाहन करत सांगितले की, मुंबईच्या आंदोलनात आता कोण कोण मंत्री सामील होतं ते बघून घेऊ आणि नंतर ठरवू. कारण हे सरकार आपली फसवणूक करत असल्याचा ठपका त्यांनी सरकारवर ठेवला आहे.

हे ही वाचा >> ‘हा जनता न्यायालयाचा इम्पॅक्ट’, चव्हाण-साळवींच्या कारवाईवरून राऊतांनी तोफ डागली

आताच का नोंदी नाहीत

मराठा आरक्षणासाठी एकूण सात महिने वेळा दिला आहे, मात्र सरकारकडून कोणतीही गोष्ट करण्यात आली नाही. त्यातच आता मराठवाड्यात नोंदी सापडत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र आताच का नोंदी सापडत नाही. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांनाही प्रमाणपत्र देण्यास सरकार का नकार देत आहे. त्यामुळे सरकारने या अधिकाऱ्यांना सूचना द्याव्या. कारण सरकार जनतेमुळं अस्तित्वात आलं आहे अधिकाऱ्यांमुळे नाही एवढंच त्यांनी लक्षात घ्यावं असा इशाराच त्यांनी दिला आहे.

हे वाचलं का?

आंदोलन मागं घेऊ नका

मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत मराठा समाजाला आवाहन करत हे आंदोलन कोणीही बंद करू नका, आणि मुंबईत आंदोलन झालं तरी मी गोळ्या झेलण्यास तयार आहे. माझं काय व्हायचं ते होऊ दे मात्र तुम्ही मागे हटू नका. कारण आपल्या पोरांचं भलं करायचं आहे असं आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. यावेळी त्यांनी हेही सांगितले की, मराठा समाजाने जर हे आंदोलन मागे घेतलं तर मात्र त्यांच्या पायावर ते दगड मारून घेणार आहे असंही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

हे ही वाचा >> Shiv Sena: ‘ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाणार हे आम्हाला माहितीच…’ भरत गोगावलेंचा गौप्यस्फोट

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT