पतीसाठी अशरफा बनली ‘सपना दीदी’; दाऊदाला मारण्याचा रचला होता कट! वाचा Inside Story

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbai Lady Don Sapna Didi Who Planned to Kill Dawood Ibrahim In Cricket Match
Mumbai Lady Don Sapna Didi Who Planned to Kill Dawood Ibrahim In Cricket Match
social share
google news

Lady Don Sapna Didi Story : मुंबईत अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमची (Dawood Ibrahim) दहशत होती हा तेव्हाचा काळ आहे. तो दुबईत त्याच्या ‘व्हाइट हाऊस’मध्ये राहत होता. संपूर्ण गँग येथूनच चालत होती. मुंबईतील एका महिला त्याला मारण्याचा कट रचतेय आणि ती शत्रूंसोबत सामील झाली आहे. याची भनक दाऊदा लागली होती. गँग्स ऑफ बॉम्बे तिला ‘सपना दीदी’ (Sapna Didi) म्हणत. त्यावेळी जीन्स-टॉप घालून बाइक चालवणाऱ्या या महिलेला दाऊदला का मारायचे होते, याचे उत्तर फार कमी लोकांकडे होते. तसंच, सपना दीदीचं खरं नाव क्वचितच लोकांना माहित होतं. (Mumbai Lady Don Sapna Didi Who Planned to Kill Dawood Ibrahim In Cricket Match)

ADVERTISEMENT

दाऊदच्या खास माणसाचा पोलिसांनी केला एनकाउंटर!

दाऊदचा एक खास माणूस मुंबई विमानतळावर उतरला. विमानतळाबाहेर येताच त्याचं पोलिसांनी एनकाउंटर केलं. दाऊदच्याच एका गोष्टीला नकार दिल्यामुळे त्याच्या साथीदारांनी हा व्यक्ती दुबईहून मुंबईला येत असल्याची माहिती दिली होती. यानंतर त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून रुग्णालयात नेण्यात आला. महमूद असे या व्यक्तीचे नाव होते.

वाचा : CM एकनाथ शिंदे म्हणाले ठाकरे एक नंबरचे मुख्यमंत्री आहेत, पण…  

महमूदच्या शोधात एक महिला जवळच्या पोलीस ठाण्यात गेली. कोणीतरी तिला जेजे रूग्णालयात जाण्यास सांगितलं. तेथे पोहोचल्यावर महमूदचा मृतदेह शवागारात पडून असल्याचे तिने पाहिले. ती ढसाढसा रडायला लागली. ही महमूदची पत्नी अशरफा होती. दोघांनी प्रेमविवाह केला होता.

हे वाचलं का?

पतीच्या मृत्यूनंतर अशरफाच्या मनात सूडाची आग

पतीच्या मृत्यूनंतर अशरफाच्या मनात सूडाची आग पेटू लागली. तिला कोणत्याही परिस्थितीत दाऊदचा जीव घ्यायचा होता. यावेळी तिला मुहम्मद हुसैन नावाच्या व्यक्तीची माहिती मिळाली. जो हुसैन उस्तरा म्हणून प्रसिद्ध होता. खरं तर तरुण वयात हुसैनने एका मुलाला वस्तरा मारून गंभीर जखमी केलं होते. तेव्हापासून त्याला हे उस्तरा असं नाव पडलं होतं.

तो दाऊदचा शत्रू होता. अशरफा त्याला भेटण्यासाठी पोहोचली. सुरूवातीला तिची कहाणी ऐकून हुसैन हसला. पण त्याला अशरफाचे इरादे मजबूत असल्याचे जाणवले आणि त्याने तिला मदत करण्याचे ठरवले. हुसैनने अशरफाला ज्युडो-मार्शल आर्ट आणि शस्त्र हाताळण्याचे प्रशिक्षण दिले.

ADVERTISEMENT

वाचा : Mohammed Shami ला मोदी सरकारकडून मोठा पुरस्कार जाहीर

अशरफाच्या मजबुरीचा हुसैनने घेतला फायदा

अशरफाला हळूहळू दाऊदचा ठावठिकाणा कळू लागला होता. तिने पोलिसांना माहिती देण्यास सुरुवात केली. मुंबईतील दाऊदची मुळे हादरवण्यासाठी अशरफाने सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले. दाऊदला हे कळताच त्याने अशरफाच्या मागे गुंड पाठवले. एके दिवशी रात्रीच्यावेळी दाऊदने पाठवलेले गुंड अशरफाचा पाठलाग करत होते. यावेळी ती आधारासाठी हुसैनकडे गेली. हुसैनने तिला मदत तर केली पण मजबुरीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्या दिवसापासून अशरफाने हुसैनशी मैत्री तोडली.

ADVERTISEMENT

अशरफा-सपना दीदी कनेक्शन काय?

यानंतर अशरफाने तेव्हाचा प्रसिद्ध डॉन आणि दाऊदचा मोठा शत्रू अरुण गवळीची मदत घेण्याचं ठरवलं. अशरफा त्याच्याकडे गेली आणि मदत मागितली पण अरूण गवळीने मदत करण्यास नकार दिला. तो तिच्यासारख्या लोकांवर विश्वास ठेवू शकत नव्हता. तिच्या लक्षात आलं की, अशरफा बनून काहीच काम होणार नाही.

त्या दिवसापासून तिने आपले नाव बदलून सपना ठेवले. बुरखा सोडून तिने जीन्स टॉप घालायला सुरुवात केली. बाईक चालवायला सुरुवात केली. काही वेळातच तिने गँगही बनवली ज्यात ते गुंड होते जे दाऊदवर खार खाऊन होते. सपना… लेडी डॉन सपना दीदी बनली.

अंडरवर्ल्डमध्ये ती याच नावाने ओळखली जाऊ लागली. 90 च्या दशकाच्या सुरुवातीला सपनाला कळले की दाऊद भारताचा जवळपास प्रत्येक सामना पाहतो. प्रत्येक स्टेडियममध्ये त्याच्यासाठी एक व्हीआयपी सीट आधीच बुक केलेली असते. सपनाने त्याला येथे मारण्याचा कट रचला.

वाचा : Eknath Shinde : ‘पेग्विंन… कफनचोर… खिचडीचोर’; CM शिंदे विधानसभेत ठाकरेंवर बरसले

सपना दीदीचा नेमका प्लान काय होता?

1990 च्या आसपास सपनाने काही गुंडांना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर पाठवले. त्यावेळी तिथे भारत-पाकिस्तान क्रिकेट सामने खेळले जात होते. सपानाचे गुंड तेथून ते दाऊदची माहिती गोळा करून आणि काही व्हिडिओ घेऊन परसतले. ज्यात दाऊद स्टेडियममध्ये बसून सामना पाहत होता. सपनाने स्टेडियमचा नकाशा तयार केला. दाऊद शस्त्राशिवाय येथे येईल, असे आपल्या गुडांना सांगितले. पण तुम्ही तुमच्याजवळ चाकू ठेवा, कसा तरी लपवा आणि स्टेडियममध्ये घेऊन जा आणि गर्दीत संधी मिळाल्यास तिथे दाऊदला ठार करा. हा प्लान यशस्वी होईल असा विश्वास सपनाला होता. ती ही दुबईला जाण्याच्या तयारीत होती.

दाऊदनेच केला सपनाचा गेम

सपनाच्या या प्लानची कल्पना दाऊदच्या जवळचा असलेल्या छोटा शकीलला आली होती. त्याने सपनाला मारण्याचा निर्णय घेतला. एके दिवशी सपना घरी झोपली होती. दरम्यान शकीलचे गुंड आले आणि सपनाला घेऊन गेले. सपनाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सापडला, तिची वार करून हत्या करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT