Pneumonia Outbreak : कोरोनानंतर चीनमध्ये नव्या आजाराचा उद्रेक! दिल्लीतही आढळले 7 रूग्ण!
मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया (Microplasma pneumonia) या चिनमधून आलेल्या नवीन जीवाणूने भारतातही प्रवेश केल्याचं दिसत आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे.
ADVERTISEMENT
Mysterious Pneumonia : कोरोनाचं सावट कमी झालेलं असताना चीनमधून (China) आलेल्या एका नवीन अपडेटमुळे भारताची चिंता वाढली आहे. मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया (Microplasma pneumonia) या चीनमधून आलेल्या नवीन जीवाणूने भारतातही प्रवेश केल्याचं दिसत आहे. ज्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहे. या आजाराने चीनमध्ये कहर केला आहे. दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली आहेत. (New China Bacterial Virus in india 7 patients found Microplasma Pneumonia Positive in Delhi AIIMS)
ADVERTISEMENT
चीनमधल्या नव्या आजाराची भारतात एन्ट्री?
AIIMS ने PCR आणि IDM-ELISA या दोन चाचण्यांद्वारे चीनमध्ये लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार निर्माण करणार्या बॅक्टेरिया मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे नोंदवली आहेत. पीसीआर आणि आयजीएम एलिसा चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह रेट तीन आणि 16 टक्के असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच चीनमधून आलेल्या कोरोनाचा सामना केल्यानंतर भारतात या आजाराची भीती पसरू लागली आहे.
वाचा : Nawab Malik : अजित पवारांचा कॉल, शरद पवारांना धक्का; मलिक महायुती बरोबर?
अहवालानुसार, भारतात मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया शोधण्यासाठी चाचणी करण्याची गरज आहे. एम्स दिल्लीने या वर्षी एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान चीनमध्ये पसरलेल्या मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या सात प्रकरणांची तपासणी केली आहे. लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालात असे म्हटले आहे की, संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर चाचणीद्वारे एक प्रकरण आढळले होते तर उर्वरित सहा प्रकरणे IgM ELISA चाचणीद्वारे आढळून आली.
हे वाचलं का?
चीनमध्ये मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाची वाढती प्रकरणं!
चीन आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये ‘वॉकिंग न्यूमोनिया’च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ‘वॉकिंग न्यूमोनिया’ हा शब्द न्यूमोनियाच्या सौम्य स्वरूपाचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो. भारतात त्याची प्रकरणे आढळून आल्याने, चिंता देखील वाढली आहे कारण चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनमधून येऊन जगभरात पसरला.
वाचा : Video : गंभीर-श्रीसंत मैदानातच भिडले, सामना सुरू असताना काय घडलं?
एम्स दिल्लीच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख आणि कन्सोर्टियमचे सदस्य डॉ. रामा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाला 15-20% कम्युनिटी एक्वायर्ड न्यूमोनियाचं कारण मानलं जातं.
ADVERTISEMENT
डॉ चौधरी जे सध्या NIMS, जयपूर येथे डीन आहेत, ते म्हणाले, ‘या जीवाणूमुळे होणारा न्यूमोनिया हा सहसा सौम्य असतो, म्हणून त्याला ‘वॉकिंग न्यूमोनिया’ असेही म्हणतात. परंतु गंभीर प्रकरणे देखील उद्भवू शकतात. एम्स दिल्ली हे मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाच्या प्रसारावर देखरेख करणार्या जागतिक कंसोर्टियमचा देखील एक भाग आहे.
ADVERTISEMENT
मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाचा संसर्ग सामान्यतः लहान मुलांमध्ये दिसत आहे. परंतु तो कोणालाही प्रभावित करू शकतो.
वाचा : Maratha Reservation : “फडणवीस सरकारने मराठा…”, संभाजीराजेंचं खासदारांना पत्र, लढा होणार तीव्र?
मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनियाची लक्षणे काय आहेत?
मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया संसर्गाची काही सामान्य लक्षणे आहेत जसं की घसा खवखवणे, थकवा जाणवणे, डोकेदुखी, ताप, खोकला जो आठवडे किंवा महिने टिकतो.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT