Onion Price: कांदा मोदी सरकारचा वाढवणार ताप…, दोन बैठकीत असं काय घडलं?
कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावे या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून नाशिकमधील कांदा व्यापाऱ्यांचा संप चालू आहे. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या बैठकीनंतरही तोडगा निघाला नसल्याने आता नाशिकमधील व्यापाऱ्यांनी दिल्लीला धडक मारण्याचा निर्णय घेतला आहे.
ADVERTISEMENT
onion strike: कांदा निर्यातवरील निर्यातशुल्क (Onion export) रद्द करावे, नाफेड आणि एनसीसीएफने थेट ग्राहकांना कांदा विकावा, बाजार समितीत कांदा विकू नये यांसह विविध मागण्यासांठी कांदा व्यापाऱ्यांनी लिलावात भाग घेणे बंद (stop participating auction) केले आहेत. नाशिकसाठीच्या या गंभीर प्रश्नावर विविध मंत्र्यांनी बैठका घेतल्या. काल उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit pawar) यांनी बैठक घेतली. त्यानंतर सायंकाळी वाणिज्य केंद्रीय मंत्री पियुष गोयल (Union Commerce Minister Piyush Goyal) यांनीही बैठक घेतली, मात्र निर्णय काहीच झाला नाही. (onion traders strike nashik cancel duty on export delhi meeting discuss loss of 100 crores)
ADVERTISEMENT
केंद्राबरोबरची चर्चा निष्फळ
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड आणि ‘एनसीसीएफ’ यांनी थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावी, अशी मागणी नाशिकमधील आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी केली. ही मागणी सध्याच्या कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्यांव्यतिरिक्त होती. तसेच निर्यात शुल्कावर केंद्राबरोबर चर्चा करूनही तोडगा देखील निघालेला नाही. त्यामुळे राज्य सरकार ना शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकले ना व्यापाऱ्यांना अशी स्थिती कालच्या दोन्ही बैठकानंतर होती.
हे ही वाचा >> शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय लांबणार! असं आहे सुनावणीचं वेळापत्रक
कांद्याची आवक थांबली
सलग सहा दिवस जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद आहे. लासलगाव, पिंपळगावसह 17 बाजारसमित्यांमध्ये साधारण रोज 1 ते दीड लाख क्विंटल कांदा येतो, मात्र गेल्या सहा-सात दिवसांत 7 लाख क्विंटलहून अधिक कांद्याची आवक थांबली आहे. आणि 100 कोटींहून अधिक रुपयांचा व्यवसाय ठप्प झाला आहे.
हे वाचलं का?
आता दिल्लीत बैठक
यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी दिल्ली येथे 29 सप्टेंबरला पुढची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी दिली. दिल्ली येथील बैठकीस महाराष्ट्रातर्फे मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
शेतकऱ्यांची गैरसोय
कांदा उत्पादक शेतकरी, व्यापाऱ्यांसह ग्राहकवर्गाच्याही हिताचे रक्षण करण्याचा राज्य शासनाचा सर्वतोपरी प्रयत्न आहे, असे वक्तव्य यावेळी मंत्र्यांनी केले. कांदा उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी लिलाव बंदीचा निर्णय मागे घेऊन तातडीने कांदा खरेदी सुरू करावी, असे आवाहन केंद्रीय वाणिज्यमंत्री गोयल, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उपस्थितांनी केले.
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Pune : दोनच दिवसापूर्वी लग्न, देवदर्शनावरून परतताना नवरा-बायकोचा दुदैर्वी अंत
संप सुरुच राहणार
कांदा व्यापाऱ्यांनी आपला निर्धार कायम ठेवला असल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी दिली. सात दिवसांपासून सुरु असलेला संप पुढे चालू राहणार आहे. नाशिकला व्यापाऱ्यांशी चर्चा केली जाईल असंही त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT