Gold Price Today : सोनं झालं खूपच स्वस्त… किती रुपयांनी घसरल्या किंमती?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

The price of gold is under pressure due to turmoil in the international market. Given this decline, is this the right time to invest in gold?
The price of gold is under pressure due to turmoil in the international market. Given this decline, is this the right time to invest in gold?
social share
google news

Gold Rate today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सुरु असलेल्या उलथापालथीचा सोन्याच्या किमतीवर दबाव दिसत आहे. ही घसरण पाहता सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे का? खरे तर काही दिवसांनी सणासुदीला सुरुवात होणार आहे. भारतात सणासुदीच्या काळात सोन्याची मागणी वाढते. भारतात विशेषत: दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोने खरेदी करण्याची परंपरा आहे. (How did gold become so cheap)

ADVERTISEMENT

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण होत असून, विशेषत: अमेरिकन बाजारातील दबावामुळे सोन्याच्या दरात घसरण होत आहे. बुधवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ०.१७ टक्क्यांनी घसरून प्रति सव्वा दोन तोळे १८२७.४० डॉलर झाला. तर यावर्षी 6 मे रोजी ते $2,085.40 प्रति सव्वा दोन तोळ्यांवर पोहोचले होते. त्याचवेळी चांदीचा दर ०.४८ टक्क्यांनी घसरून २१.२८ डॉलर प्रति सव्वा दोन तोळे झाला आहे.

सोन्याच्या दरात मोठी घसरण

अमेरिका फेडकडून व्याजदरात वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सोन्या-चांदीच्या किमतींवर दबाव दिसून येत आहे. त्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. पण भारतीय सोने गुंतवणूकदारांसाठी ही संधी आहे का? 5 मे रोजी भारतीय सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 61,739 रुपये होती. जो आता 56 हजारांच्या आसपास घसरला आहे. इतकंच नाही तर मे महिन्यात ट्रेडिंगदरम्यान अहमदाबाद सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमचा भाव 63,500 रुपयांवर पोहोचला होता. अशा स्थितीत सोन्याचा भाव उच्चांकावरून 5000 रुपये प्रति 10 ग्रॅमने कमी झाला आहे. गेल्या 4 महिन्यांत या किमती घसरल्या आहेत.

हे वाचलं का?

हेही वाचा >> OBC Politics Election 2024 : ओबीसी व्होट बँक राजकारणात किती मोठी गेमचेंजर?

भारताबद्दल बोलायचे झाले तर बुधवारी सोने अत्यंत स्वस्त दरात उपलब्ध होते. 24 कॅरेट सोन्याचा भाव 56653 रुपये, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 51894 रुपये होता. 22 कॅरेट सोन्याचा भाव बुधवारी संध्याकाळी 52000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या खाली घसरला. तर चांदीचा दर 70,000 रुपये प्रति किलो इतका राहिला आहे. मे महिन्यात चांदीचा भाव 77280 रुपयांवर पोहोचला होता.

अमेरिकेमुळे सोन्याच्या भाव कमी

सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणात बाजारात सोन्याची मागणी आणि पुरवठ्याच्या आधारावर ठरवली जाते. सोन्याची मागणी वाढल्यास दरही वाढतील. जागतिक आर्थिक परिस्थितीचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ, जर आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खराब कामगिरी करत असेल तर गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची निवड करतात, ज्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात.

ADVERTISEMENT

समजून घ्या: दसरा मेळावा अन् शिवसेना… शिवाजी पार्कवरुन काय झालेला राडा?

जागतिक बाजारात सोने सध्या 7 महिन्यांतील नीचांकी पातळीवर आहे. यूएस डॉलर निर्देशांकात वाढ झाल्यामुळे इतर चलनांमध्ये सोन्याच्या किमती नरमल्या. तज्ज्ञांच्या मते, जागतिक अर्थव्यवस्थेवर व्यापक आणि दीर्घकालीन दबाव स्पष्ट होईल तेव्हाच सोन्यात नेत्रदीपक वाढ होऊ शकते. त्याच वेळी, जोपर्यंत अमेरिकेत व्याजदर कपातीची शक्यता फारच प्रबळ नाही, तोपर्यंत सोन्यावर दबाव कायम राहू शकतो. तथापि, भारतात सणासुदीच्या काळात खरेदी केल्याने किमतींना आधार मिळू शकतो.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT