रंग खेळायला नदीत गेले, पुण्यात तिघे आणि नवी मुंबईत चार जण बुडाले

मुंबई तक

पुण्यात होळी खेळण्यासाठी इंद्रायणी नदीत गेलेले तीन तरूण बुडाले, तर दुसरीकडे नवी मुंबईतही बदलापूर शहरातील उल्हास नदीत खेळण्यासाठी गेलेले 4 मुलं बुडाले आहेत. 

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नवी मुंबईत होळी खेळण्यासाठी नदी काठी गेलेले 4 जण बुडाले

point

पुण्यात इंद्रायणी नदीत उतरलेले तीन जण बुडाले

राज्यभरात काल मोठ्या उत्साहात होळी साजरी केली जात असतानाच काही ठिकाणी दु:खद घटना घडल्या आहेत. पुण्यातील मावळ परिसरात काल होळी खेळण्यासाठी इंद्रायणी नदीत गेलेल्या तीन तरूणांचा बुडून मृत्यू झाला. तर दुसरीकडे नवी मुंबईतही बदलापूर शहरातील उल्हास नदीत खेळण्यासाठी गेलेले 4 मुलं बुडाले आहेत. 

इंद्रायणीत कसे बुडाले मुलं? 

होळीनिमित्त इंद्रायणी नदीत बुडून तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी आहेत. ही घटना आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली. पाच मित्र पोहायला गेले. यातील तिघांचा पोहताना गुदमरून मृत्यू झाला. अशी माहिती देहू रोड पोलिसांनी दिली आहे. रोहित उर्फ ​​गौतम कांबळे, विशाल उर्फ ​​राज दिलीप अचमे आणि आकाश विठ्ठल कोरडे अशी मृत तरुणांची नावे आहेत.

हे ही वाचा >> Pune : स्विमिंग पूलमध्ये बुडून चिमुकल्याचा अंत, खेळायला सोडून गेले होते आजोबा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित, आकाश आणि विशाल हे इतर दोन मित्रांसह मावळातील किन्हई गावाजवळील इंद्रायणी नदीत पोहण्यासाठी गेले होते. आकाश, विशाल आणि रोहित यांनी इंद्राणी नदीत उडी घेतली. बाकीचे दोन लोक नदीच्या काठावर बसले होते. पोहताना तिघांचाही गुदमरून बुडून मृत्यू झाला. ते तिघेही कुठेच दिसत नसल्यानं मित्रांनी आरडाओरडा सुरू केला. तात्काळ पोलीस, अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. सणासुदीच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. मावळ वन्यजीव संरक्षण पथकही घटनास्थळी पोहोचले. घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करत आहेत.

नवी मुंबईत काय घडलं? 

बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत रंग खेळण्यासाठी गेलेल्या चार मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची संतापजनक घटना बदलापूरमध्ये घडली आहे. होळीनिमित्त रंग खेळल्यानंतर ही मुलं रंग धुण्यासाठी उल्हास नदीवर गेली होती. आर्यन मेदार, आर्यन सिंग, सिद्धार्थ सिंग आणि ओम सिंग तोमर अशी मृत मुलांची नावे आहेत, ही सर्व मुले बदलापूर येथील पोद्दार होम कॉम्प्लेक्समधील रहिवासी होती.

हे ही वाचा >>Maharashtra Weather : नागपूरसह 'या' जिल्ह्यांमध्ये लोकांना फुटणार घाम! कोणत्या जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरणार? जाणून घ्या

होळीच्या दिवशी रंग खेळल्यानंतर ही चार मुले त्यांच्या इतर मित्रांसह उल्हास नदीच्या काठावर रंग काढण्यासाठी गेली होती, मात्र त्यांना नदीतील पाण्याची खोली कळत नसल्याने ही चार मुलं बुडाली. दरम्यान, बदलापूर अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून या चार मुलांचे मृतदेह बाहेर काढले या घटनेने बदलापूर शहरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp