Rajan Salvi : “शिवसेनाप्रमुखांच्या फोटो आणि खुर्चीची किंमत 10 हजार ठरवली”
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी एसीबीने केलेल्या कारवाईबद्दल का व्यक्त केली आहे नाराजी? समजून घ्या प्रकरण…
ADVERTISEMENT
Rajan Salvi ACB : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांनी एक हळवी पोस्ट शेअर केली आहे. राजन साळवी यांच्या घरातील काही वस्तू लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली आहे. या वस्तूंच्या किंमती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून निश्चित करण्यात आल्या असून, त्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना भवनातील आसनाचाही उल्लेख आहे. याबद्दल दुःख व्यक्त करणारी पोस्ट साळवी यांनी लिहिली आहे.
ADVERTISEMENT
राजन साळवी यांची फेसबुक पोस्ट…
“अँटी करप्शन (ACB) कडून माझ्या निष्ठतेचे मोल दुर्दैवी…”
“काही दिवसांपूर्वी माझ्या रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB)ने धाड टाकली. त्यांना सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन केले. परंतु दुर्दैवाची बाब म्हणजे ज्या आसनावर बसून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना चालवली, वाढवून आज जे राज्यकर्ते झालेत; त्यांना नावारूपाला आणले त्यांच्या आदेशाने त्या माझ्या घरातील आसनांची किंमत ठरवावी दुर्दैवीच ना.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> काँग्रेस सोडणार, अजित पवारांसोबत जाणार! कोण आहेत बाबा सिद्दीकी?
“हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांनी शिवसेना भवन, दादर येथे बसून शिवसेना महाराष्ट्रभर तळागाळापर्यंत रुजवली ते आसन मी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ह्यांच्या परवानगीने माझा निवासस्थानी नित्यपूजेसाठी आणले. त्यावेळी माझा चिरंजीव अथर्व ह्याने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्यांच्या वरील निष्ठेने एक त्यांचे सुंदर चित्र रेखाटले.”
हेही वाचा >> सुनील तटकरेंचा पत्ता होणार कट? भाजपचा रायगड लोकसभेसाठी प्लॅन काय?
ADVERTISEMENT
“माझी पत्नी अनुजा व मी त्या आसनांची नित्यनियमाने पूजा करतो, परंतु दुर्दैवाची बाब माझ्या रत्नागिरी येथील राहत्या घरावर अँटी करप्शन (ACB)ने धाड टाकली व त्या आसनांची व फोटोची मी शिवसैनिक म्हणून अनमोल समजतो, त्याची किंमत ठरवली खुप दुर्दैवी.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT