Sharad Mohol च्या हत्येनंतर पत्नीने घेतली फडणवीसांची भेट, गृहमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. या दरम्यान शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.
ADVERTISEMENT
Sharad Mohol Murder Case : कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या हत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली.या 8 आरोपींपैकी सहा आरोपींना 10 जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.सध्या या घटनेची पुणे शहरात चर्चा आहे. असे असतानाच शरद मोहोळच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत स्वाती मोहोळ यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (sharad mohol murder case swati mohol meet devendra fadnavis bring me justice pune police)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस आज पुण्यात होते. या दरम्यान शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस गाडीत बसून निघून गेले होते. दरम्यान शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ या भाजपच्या पुणे शहर महिला आघाडीच्या सरचिटणीस आहेत. स्वाती मोहोळ यांनी राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत एप्रिल 2023 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. स्वाती मोहोळ यांच्या भाजप पक्ष प्रवेशानंतर शरद मोहोळ राजकारणात एन्ट्री करणार अशीही चर्चा होती. पण त्या आधीच त्याची हत्या करण्यात आली.
हे ही वाचा : ‘अजित पवारांच्या पोटातलं ओठात आलं’, मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांचा पलटवार
‘या’ कारणामुळे मोहोळला संपवलं?
कुख्यात गुंड शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तीन साथीदारांनीच त्याच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या केली होती. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (20) राहणार सुतारदरा हा या हत्याकांडातील मास्टरमाईंड आहे. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ याच्याबरोबर नेहमी फिरायचा. आरोपी साहिल याचा मामा नामदेव महिपती कानगुडे दुसरा तर त्याचा एक नातेवाईक विठ्ठल किसन गांडले हा या प्रकरणातील तिसरा आरोपी होता. नामदेव कानगुडे आणि विठ्ठल गांडल या दोघांचे शरद मोहोळसोबत पुर्ववैमनस्य होते. याच जुन्या वादातून शरद मोहोळ यांची हत्या करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली.
हे वाचलं का?
हे ही वाचा : Ajit Pawar : ‘आम्ही कुठे चुकलो…, अजितदादांचा शरद पवारांवर हल्ला
या हत्येनंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली. पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरून या 8 जणांनी साताऱ्याच्या दिशेने वाहनातून पळून जायचे ठरवले होते. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाड्यांचे नंबर ट्रेस करुन त्यांचा पाठलाग करून शिरवळ हल्लेखोरांना ताब्यात घेतले होते. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी सहा आरोपींना 10 जानेवारीपर्यंत आणि दोन वकिलांना 8 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT