Ghaziabad: 14 वर्षाच्या मुलाने बापाच्या मांडीवरच तडफडून सोडला जीव! काय घडलं, कुणाची चूक?
उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रेबीजचं एक भयानक प्रकरण समोर आलं, जिथे एका 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला. तो हवा आणि पाण्याला घाबरून अंधारात राहू लागला. मुलाची बिकट अवस्था पाहून नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. साबेजला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
Ghaziabad Boy Dies of Rabies : रेबीज हा एक असा भयानक आजार आहे ज्यावर वेळीच प्रतिबंध आणि उपचार न केल्यास व्यक्ती एकतर कोमात जातो किंवा त्याचा तडफडून मृत्यू होतो. हा मृत्यू खूप वेदनादायी असतो. मंगळवारी (5 सप्टेंबर) , उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये रेबीजचं एक भयानक प्रकरण समोर आलं, जिथे एका 14 वर्षांच्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला. या प्रकरणात कशी आणि कोणाची चूक होती? कोणाच्या बेजाबदारपणामुळे हे घडलं? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. (Ghaziabad Boy Dies of Rabies Over a Month After Dog Bite)
ADVERTISEMENT
हे प्रकरण विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चरणसिंग कॉलनी येथील आहे. येथे पाच दिवसांपूर्वी साबेज नावाच्या मुलामध्ये रेबीजची लक्षणं दिसून आली. तो हवा आणि पाण्याला घाबरून अंधारात राहू लागला. मुलाची बिकट अवस्था पाहून नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यास नकार दिला. साबेजला योग्य उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला.
INDIA Vs Bharat : ‘भाजप जिन्नांच्याच विचाराची री ओढतेय’, शशी थरुरांनी सांगितला इतिहास
नेमकं प्रकरण आहे तरी काय?
याकुब नावाच्या व्यक्तीचा 14 वर्षांचा मुलगा साबेज याला महिनाभरापूर्वी कुत्र्याने चावा घेतला होता. मुलाने भीतीपोटी याबाबत कोणालाही माहिती न दिल्याने येथे प्रथम निष्काळजीपणा दिसून आला. 5 दिवसांपूर्वी त्याच्या शरीरात विचित्र बदल दिसू लागले. त्याच्या तोंडातून लाळ टपकत होती आणि त्याला पाणी प्यायलाही भीती वाटत होती. चेहराही विचित्र झाला होता.
हे वाचलं का?
त्यानंतर घरच्यांना काळजी वाटू लागली. पण त्याला काहीच समजत नव्हते. दुसरा निष्काळजीपणा येथे दिसून आला. कुटुंबीयांनी त्याची प्रथम तपासणी केली नाही. त्यानंतर त्या मुलाने सांगितले की, त्याला महिनाभरापूर्वी कुत्रा चावला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती.
Dahi handi 2023 : मुंबईतील निर्भया गोविंदा पथक ‘माँ काली’च्या वेशात फोडणार दहीहंडी, कारण काय?
डॉक्टरांनी तपासणी केली असता कुत्रा चावल्यामुळे रेबीजची लक्षणं आढळून आली. त्याच्यामध्ये रोगाचा संसर्ग खूप वाढला होता. तिसरा निष्काळजीपणा इथे समोर आला.साबेझच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, कोणत्याही डॉक्टरने मुलावर योग्य उपचार केले नाहीत. एकाही रूग्णालयाने साबेजला भरती करून घेतलं नाही. कुटुंबीयांनी त्याला गाझियाबाद जिल्ह्यातील एमएम रुग्णालयाशिवाय, दिल्ली आणि मेरठच्या जीटीबी आणि एम्स रुग्णालयात उपचारासाठी नेले, परंतु साबेजवर कुठेही उपचार झाले नाहीत.
ADVERTISEMENT
रुग्णवाहिकेत वडिलांच्या मांडीवर तडफडून घेतला अखेरचा श्वास!
साबेजला सतत वेदना होत होत्या. घरातील सदस्यांचीही दुरवस्था झाली होती, रडत होते. मुलाच्या उपचारासाठी त्यांची सर्वत्र धावपळ सुरू होती. साबेझचे कुटुंबीय उपचारासाठी 3 दिवस रुग्णवाहिकेत भटकत राहिले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने रुग्णवाहिकेतच वडिलांच्या कुशीत साबेझचा मृत्यू झाला.
ADVERTISEMENT
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, साबेजला चावणारा कुत्रा शेजारी राहणाऱ्या महिलेचा होता. त्या कुत्र्याशिवाय महिलेकडे आणखी 5 ते 6 कुत्रे आहेत. ते अनेकदा लोकांना चावतात.
Crime : भाजप नेत्याचा बापासमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार, घटनाक्रम ऐकून पोलिसही हादरले
कुटुंबीयांचे प्रशासनाला कारवाईचे आवाहन
साबेजच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, ‘त्यांच्या मुलासोबत जे घडले ते कोणत्याही मुलासोबत होऊ नये. यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पाऊलं उचलून कायदेशीर कारवाई करावी. त्याचवेळी रस्त्यावरील कुत्र्यांना खायला देणाऱ्या महिलेला महापालिकेने नोटीस पाठवली आहे.’
रेबीज म्हणजे काय?
रेबीज हा एक प्राणघातक विषाणू आहे जो प्राण्यांच्या लाळेद्वारे लोकांमध्ये पसरतो. एकदा एखाद्या व्यक्तीला रेबीजची लक्षणं दिसू लागली की, हा आजार मृत्यूचे कारण बनतो. काही प्रकरणं वगळता, रेबीजमुळे मृत्यूची शक्यता जास्त असते. तज्ज्ञांच्या मते, लोकांना असे वाटते की रेबीज फक्त कुत्रा चावल्याने होतो, परंतु हा रोग मांजर, घोडा आणि वटवाघळांच्या चाव्याव्दारे देखील पसरतो. कोणताही प्राणी चावल्यास रेबीजची लस ताबडतोब घेणे महत्वाचे आहे.
WHO च्या माहितीनुसार, रेबीज हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो मज्जासंस्था आणि मेंदूवर परिणाम करतो. रेबीजचा विषाणू शरीरात 20 ते 60 दिवस राहू शकतो आणि त्यावर उपचार न केल्यास मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT