Maharashtra Assembly Election 2024 Live : 'आमचे सरकार आल्यावर महिलांना...', उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा!
LIVE Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या घडामोडी 'मुंबई Tak'च्या या लाइव्ह ब्लॉगमध्ये जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
Maharashtra Assembly Election 2024 News LIVE in Marathi : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या मतदारसंघात सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. शिरूर हवेली मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे.
ADVERTISEMENT
शिरूर हवेली मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांची नांदेडच्या लोहामध्ये आज जाहीर सभा होणार आहे.
अशाच महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, विधानसभेसंदर्भातील सर्व अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर...
ADVERTISEMENT
लाइव्हब्लॉग बंद
- 05:27 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : महेश चव्हाण यांचा देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
प्रहारच्या महेश चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झाला. त्यानंतर महेश चव्हान यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. महेश चव्हाण यांची उमेदवारीचा विषय हा न्यायप्रविष्ठ आहे. अशात चव्हाण यांनी भाजपा प्रवेश केल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. महेश चव्हाण हे शिवसेनेचे संजय राठोड यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे आता त्यांच्या पक्ष प्रवेशाचा भाजपा उमेदवार सई डहाके यांना राजकीय फायदा होतो का? याकडे कारंजा मतदारसंघातील मतदारांचे लक्ष आहे.
- 05:26 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : कोणालाच माणसाची किंमत उरली नाही
“मला प्रत्येक ठिकाणी जाणे शक्य होत नाही. या मतदारसंघात पहिली शेतकरी आत्महत्या झाली होती. उमरखेडमध्ये शेतकरी आत्महत्या करतात, हे बघायला कोणी आलं नाही. त्यांचं कुटुंब काय करतय हे बघायला कोणी आलं नाही. कारण कोणालाच माणसाची किंमत उरली नाही, असे राज ठाकरे म्हणाले.
- 03:14 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : 'आमचे सरकार आल्यावर महिलांना...', उद्धव ठाकरेंनी केली मोठी घोषणा!
आमचे सरकार आल्यावर महिलांना तीन हजार रुपये महिन्याला रक्कम देणार आहे. तसेच राज्यातील फक्त मुलींनाच नाही तर सर्व मुलांना मोफत शिक्षण देणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
- 02:36 PM • 09 Nov 2024
नाना पटोले यांचा रावसाहेब दानवे यांना टोला
तांदूळ चोरणाऱ्याला कल्याण काळेनी हरवलं नाना पटोले यांचा रावसाहेब दानवे यांना टोला लगावला. शिवाजी महाराजांच्या नखासोबत ही यांची तुलना होऊ शकत नाही, असे पटोले म्हणाले.
- 02:35 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : लाटकरांच्या इच्छेमुळे मधुरिमाराजेंनी माघार घेतली- छत्रपती शाहू महाराज
लाटकरांच्या इच्छेमुळे मधुरिमाराजेंनी माघार घेतल्याचे छत्रपती शाहू महाराज यांनी स्पष्टीकरण दिले. कोल्हापूर उत्तर मतदारसंघावरून मोठा खल झाला होता.
- 12:59 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : कोणता गरीब झोपडपट्टीत दिसल्यास सांगा, त्यांना घर बांधून देणार – नरेंद्र मोदी
“आमचं सरकार पुन्हा येऊन काही महिने झालेत. 70 वर्षांवरील वृद्धांच्या औषधांच्या खर्चाची चिंता करु नका. हा त्यांचा मुलगा आहे. औषधांचा खर्च मोफत करणार. कोणता गरीब झोपडपट्टीत दिसल्यास सांगा. त्यांना घर बांधून देणार. आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा.
- 12:59 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : गरीबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली – नरेंद्र मोदी
“2014 ते 2024 या काळात जनतेने भाजपाला आशिर्वाद दिला. महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याच सुख मला मिळालं. गरीबांसाठी आम्ही 4 कोटी घरं उभारली. महाराष्ट्रातील गरीब कुटुंबांच घराच स्वप्न साकार होणार. वाढवण बंदर हे देशातील मोठ बंदर असणार. त्यासाठी 80 हजार कोटी रुपये दिलय” अकोल्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा.
- 12:59 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : अकोल्यातील सभेतून PM मोदींनी मांडले महत्त्वाचे मुद्दे!
- आम्ही मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला.
- भाजप-महायुती आहे तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे, मोदींची अकोल्यात घोषणा
- महायुतीसाठी तुमच्याकडे आशीर्वाद मागायला आलोय
- आजची तारीख ऐतिहासिक 9 नोव्हेंबर 2019 मध्ये सुप्रीम कोर्टाने राम मंदिरावर निर्णय दिला होता
- अकोल्यात पंतप्रधान मोदींकडून 'जय श्रीराम'ची घोषणा
- माझ्यासाठी महाराष्ट्राची सेवा करण्याचं सुख वेगळंच आहे
- डहाणूमधील वाढवण बंदर भारतातील सर्वात मोठं बंदर असणार
- लाडकी बहीण योजनेचा विस्तार, रोजगार ही कामं महायुती वेगाने करेल
- 12:36 PM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : आदित्य ठाकरेंचा वरळीत जोरदार प्रचार! मनसेवर केली टीका
आदित्य ठाकरेंकडून वरळीत जोरदार प्रचार सुरु आहे. त्यांच्या स्वागतासाठी अनेक कार्यकर्त्यांनी वरळीत गर्दी केली आहे. महाराष्ट्र महाविकासाआघाडीला साथ देणार, अशा विश्वास आदित्य ठाकरेंनी व्यक्त केला. मनसेला निवडणुकीच्या दोन महिने आधी जाग येते, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली
- 11:39 AM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची सिंदखेडा मतदारसंघात सभा
\नरडाणा गावात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार संदीप बेडसे यांच्या प्रचारार्थ सभेचा आयोजन… सभेला धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार शोभा बच्छाव यांची उपस्थिती..
- 11:14 AM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : 'राज ठाकरे जे बोलतात, त्याची स्क्रिप्ट फडणवीस लिहितात', संजय राऊतांची टीका
राज ठाकरे जे बोलतात. त्याची स्क्रिप्ट देवेंद्र फडणवीस लिहितात. राज ठाकरे बोलले तिथे गुंडांच्या माध्यमातून निवडणूक लढली जात आहे. भाजपच्या नादी लागलेला माणूस, दुसरं काय बोलणार? राज ठाकरेंवर ईडीची टांगती तलवार असल्याने त्यांना असं बोलावं लागत आहे. ते जरी ठाकरे असले तरी मी राऊत आहे, बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला राऊत…, असं म्हणत संजय राऊतांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.
- 11:04 AM • 09 Nov 2024
Maharashtra Assembly Election 2024 : नांदेडमध्ये आज PM नरेंद्र मोदी यांची सभा
भाजप महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. आज दुपारी दोन वाजता नांदेडमध्ये सभा सुरु होणार आहे. लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा होत आहे. भाजप महायुतीच्या वतीने नरेंद्र मोदी यांच्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT