Maharashtra Elections : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांचा मोठा कट हाणून पाडला, 5 नक्षली ठार, C-60 जवानांची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

माओवाद्यांचा कट उधळून लावला
माओवाद्यांचा कट उधळून लावला
social share
google news

बातम्या हायलाइट

point

गडचिरोलीत C-60 जवानांची मोठी कारवाई

point

पोलिसांच्या कारवाईत 5 नक्षली यमसदनी

point

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई

Gadchiroli C-60 Police Action : राज्यात सध्या निवडणुकांची तयारी सुरू आहे. सगळी यंत्रणा सध्या निवडणुकांच्या तयारीत व्यस्त असून, राजकीय मंडळींचंही लक्ष निवडणुकीकडे आहे. त्यातच माओवाद्यांनी देखील या निवडणुकीत अडथळा निर्माण करण्यासाठी षडयंत्र रचण्यास सुरूवात केली होती. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 जवानांच्या पथकाने हे षडयंत्र हाणून पाडलंय. यावेळी पोलिसांनी माओवाद्यांकडून शस्त्रास्त्र देखील जप्त केले आहेत. ( Maharashtra Police action in gadchiroli against maoist amid assembly elections 2024) 

हे ही वाचा >>Vidhan Sabha: ऐन मध्यरात्री महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, महाविकास आघाडीचा आकडा ठरला!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माओवाद्यांनी मोठा घातपात घडवण्यासाठी प्लॅन केला होता. माओवाद्यांनी गडचिरोलीतील काही भागात तसा कट रचायलाही सुरूवात केली होती. मात्र महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 जवानांच्या पथकाने माओवाद्यांचे हे मनसुबे हाणून पाडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार माओवादी गडचिरोतील कोपरशी येथील जंगलातील भामरागड आणि नारायणपूर अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी दबा धरून बसलेले होते. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीत विध्वंस घडवण्याचा त्यांचा कट होता असं पोलिसांकडून मिळालेल्या माहितीतून समोर आलंय. 

हे ही >>MNS : राज ठाकरेंच्या लेकाविरोधात शिंदेंचा शिलेदार, अमित ठाकरेंविरोधात 'हा' शिवसेना नेता मैदानात

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑक्टोबरला पोलीस अधीक्षक यतीश देशमुख आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक  रमेश यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी C-60 जवानांच्या 21 युनिट आणि QRT च्या 2 युनिटने मिळून सर्च ऑपरेशन केलं. यावेळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्यावर माओवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. त्याला पोलिसांनी सडेतोड उत्तर दिलं. या कारवाईत पोलीस जवान कुमोद प्रभाकर यांना गोळी लागली त्यानंतर त्यांना तातडीने हेलिकॉप्टरच्या मदतीने बाहेर काढून नागपूरमध्ये रुग्णालयात भरती करण्यात आलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT