Maharashtra Rain : येत्या 48 तासात मुसळधार पाऊस पडणार, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Meteorological department maharashtra rain alert heavy rain in maharashtra  Meteorological department warning k s hosalikar
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
social share
google news

Maharashtra Heavy Rain Alert : महाराष्ट्रात आज आणि उद्या विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज आणि उद्या 23 जूनला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी सुखावणार आहे. (maharashtra rain alert heavy rain in maharashtra  Meteorological department warning k s hosalikar) 

महाराष्ट्र डीजीआयपीआरने एक्सवर ट्विट करून हवामान विभागाचा अंदाज शेअर केला आहे. या अंदाजानुसार,  कोकणात बहुतेक ठिकाणी, मराठवाड्यात अनेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज तर उद्या 23 जूनला कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

 हे ही वाचा : Ramdas Kadam : ''उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना 'त्यासाठी' ब्लॅकमेलं केलं''

हवामान विभागाचे तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी देखील एक्सवर पुढील 4 ते 5 दिवसांत आजपासून दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. IMD द्वारे अतिवृष्टीचे अलर्ट जारी केले आहेत. मराठवाड्याच्या काही भागात आज वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कृपया पहात रहा व दक्ष रहावे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 हे ही वाचा : 'त्या बेताल वक्तव्याची मुख्यमंत्री शिंदेंनी माफी मागावी', कोणी धाडली थेट नोटीस?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT