Maharashtra Breaking News LIVE: 'महाराष्ट्र असाच पेटता राहावा ही मविआची भूमिका', CM शिंदेंचा थेट हल्ला
Maharashtra LIVEUpdate : महाराष्ट्र हवामान अंदाज, राजकीय घडामोडी आणि विधान परिषद निवडणूक तसेच विधानसभा निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या बातम्या वाचा लाईव्ह अपडेट्समध्ये...
ADVERTISEMENT
Maharashtra News Live : महाराष्ट्रात सध्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली आहे. काही ठिकाणी पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे मुंबईसह बऱ्याच ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. आजही हवामान विभागाने काही भागांत अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यासंदर्भातील अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी कामाला लागली आहे. त्यातच विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून, दोन्ही आघाड्यांनी आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसली आहे. विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने या निवडणुकीचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात काय सुरूये... सर्व अपडेट्स वाचा लाईव्ह ब्लॉग...
ADVERTISEMENT
- 11:34 PM • 09 Jul 2024
Maratha Reservation CM Shinde: मराठा आरक्षणाच्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल
मराठा आरक्षणासाठी जी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
पाहा पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे नेमकं काय म्हणाले:
- अतिशय महत्वाच्या विषयावर बैठक आयोजित केली होती.
- सर्वांनीच या बैठकीला उपस्थित राहण्याचे मान्ष केले होते
- मात्र दुर्दैवाने राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात वातावरण निर्माण झाले आहे. हा महाराष्ट्र असाच पेटता राहावा अशी भूमिका मविआची आहे हे आज स्पष्ट झाले आहे
- राज्यात सर्व जातीपातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. मात्र आजसारखे प्रसंग आले तर सत्ताधारी विरोधक बैठक घेऊन मार्ग काढतात
- मात्र आता दोन्ही समाजाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला न्याय देत असताना ओबीसीवर अन्याय होऊ नये अशी भूमिका सरकारची आहे.
- मात्र हा संघर्ष तसाच राहावा आणि आपली पोळी भाजून घ्यावी असेच दिसते.
- आता आंदोलकांनी या लोकांचा विचार करावा
- तुम्ही आरक्षण कधी दिले नाही, आणि आम्ही न्याय दिला आणि आरक्षण दिले ते रद्द व्हावे यासाठी प्रयत्न करता हे योग्य नाही
- 10:11 PM • 09 Jul 2024
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबतच्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची महाविकास आघाडीवर जोरदार टीका
सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीत ओबीसी नेत्यांचा सगेसोयऱ्यांच्या अध्यादेशाला विरोध करण्यात आला. तब्बल दोन तास याविषयी बैठक सुरू होती. पण या बैठकीला मविआच्या नेत्यांनी बहिष्कार टाकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:
- मराठा आरक्षणासारख्या अत्यंत महत्वाच्या मुद्यावर मुख्यमंत्री यांनी बैठक बोलावली होती
- महाविकास आघाडीने ठरवून 6 वाजता बैठकीवर बहिष्कार टाकला
- पण विजय वड्डेटीवार यांच्याकडे बसून ते बैठक करत आहेत
- विरोधकांच्या मते त्यांच्यासाठी कोणताच समाज महत्वाचा नाही. त्यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत
- बाळासाहेब आंबेडकर यांनी सूचना मांडली आहे कि विरोधक असो सत्ताधारी असो त्यांनी आरक्षनसंदर्भात आपली भूमिका लेखी मांडावी.
- यावर मुख्यमंत्री योग्य प्रकारे निर्णय घेतील
- महाराष्ट्रात जातीय सलोखा निर्माण झाला पाहिजे होता
- महाराष्ट्र शांत करावा आणि प्रश्न सुटावा हा बैठकीचा हेतू होता
- मला आश्चर्य वाटतंय, मला अपेक्षा होती की पवार साहेब किंव्हा त्यांचे प्रतिनिधी तरी येतील..
- उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः तेलंगानाच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे
- 07:19 PM • 09 Jul 2024
Maharashtra News Update : सर्वपक्षीय बैठकीवर महाविकास आघाडीचा बहिष्कार
सह्याद्रीवर अतिथीगृहात आज आरक्षणासंदर्भात सर्वपक्षीय बैठक होत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर होणाऱ्या या बैठकीवर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला आहे.
या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रकाश आंबेडकर, कामगर मंत्री सुरेश खाडे, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अतुल सावे, प्रकाश शेंडगे, सदाभाऊ खोत, प्रवीण दरेकर, मनसे आमदार राजू पाटील, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह इतर नेते हजर आहेत.
- 04:07 PM • 09 Jul 2024
Worli Accident : वरळी अपघात प्रकरण, मिहीर शाहला अटक!
वरळी हिट अँड रन प्रकरणी मिहीर शाहला वरळी पोलिसांनी अटक केली आहे. मिहीर शाहसह 12 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात मोठी कारवाई केली जाईल. अपघातानंतर आरोपी मिहीर शाह फरार झाला होता. त्यानंतर आज त्याला पोलिसांकडून शाहापूर येथून अटक करण्यात आली आहे. काही वेळात मिहीर शाहची वैद्यकीय चाचणी होणार आहे.
- 02:11 PM • 09 Jul 2024
Vasant More News : माझा शिवसेनेत प्रवेश नाही तर, मी घरी परत आलोय- वसंत मोरे
'16व्या वर्षी मी शिवसैनिक झालो होतो. बारावी पास झाल्यावर मी शाखाप्रमुख झालो. माझा राजकीय प्रवास शिवसेनेतूनच सुरू झाला.' असं वसंत मोरे शिवसेना ठाकरे गटातील प्रवेशावेळी बोलले. 'माझा शिवसेनेत प्रवेश नाही तर, मी घरी परत आलोय', असंही ते यावेळी म्हणाले.
- 12:11 PM • 09 Jul 2024
Manoj Jarange : आता ना महायुती ना मविआ... जरांगेंचं मोठं विधान
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आले, तर तुमचे आंदोलन थांबणार का? या प्रश्नावर बोलताना आता महविकास आघाडीचे किंवा महायुतीचे सरकार येणार नाही, तर मराठ्यांचे सरकार निवडून येईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला.
आमचे सरकार हे आरक्षण सरकार असेल आणि ज्यांना ज्यांना आरक्षण मिळणे बाकी आहे, त्यांना आरक्षण देण्याचे काम आमचे सरकार करेल, असे विधान जरांगे पाटलांनी केले आहे.
- 11:07 AM • 09 Jul 2024
Nitesh Rane : 'आता म्हणा तेजस ठाकरेला गुजरातने पळवला', राणेंनी शेअर केला व्हिडीओ
महाराष्ट्रातील उद्योग आणि प्रोजेक्ट गुजरातला पळवल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून सातत्याने भाजपवर केला जातो. यावरूनच आता आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचलं आहे. तेजस ठाकरे यांच्या डान्सचा व्हिडीओ शेअर करत राणेंनी उत्तर दिलंय.
- 11:01 AM • 09 Jul 2024
Maharashtra Weather Forecast : चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभागाने राज्यातील चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यात पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांत गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस होईल, असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील प्रशासन यंत्रणा सतर्क झाली आहे.
वाचा >> पश्चिम, मध्य आणि हार्बर लाईनवर लोकल सेवा सुरु आहे का? अपडेट काय?
- 10:50 AM • 09 Jul 2024
Vasant More News : वसंत मोरे ठाकरेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
राज ठाकरेंची मनसेला जय महाराष्ट्र करून प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत दाखल झालेले वसंत मोरे आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज प्रवेश करणार आहेत.
मागील आठवड्यात वसंत मोरे यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो असं त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितलं होतं.
आज (९ जुलै) दुपारी बार वाजताच्या दरम्यान मातोश्री या ठिकाणी वसंत मोरे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित होणार आहे.
वसंत मोरे या आधी मनसे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले होते, मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून निवडणूक लढवली होती.
आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना ठाकरे गटात वसंत मोरे प्रवेश करत असल्याची माहिती आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT