Maharashtra Weather: ढगाळ वातावरण, मुसळधार सरी; महाराष्ट्राला आज हायअलर्ट! 

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

point

मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण

point

राज्यातील विविध भागात जोरदार पावसाची हजेरी

Maharashtra Weather News : राज्यात पावसाचा जोर चांगलाच वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने आता पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. यादरम्यान, हवामान विभागाने (IMD) आज (11 सप्टेंबर 2024) काही जिल्ह्यांना हायअलर्टचा इशारा दिला आहे. (maharashtra Weather update today IMD alert 11 september 2024 mumbai pune weather report)

हवामान विभागान दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून अधून -मधून सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर राज्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. 

हेही वाचा : Govt Job: मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत 'पुणे महानगरपालिकेत' नोकरीची संधी!

राज्यातील विविध भागात पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विदर्भातील भंडारा, नागपूर, यवतमाळ, वर्धा येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हवामान विभागाने पुढील दोन दिवस यलो अलर्ट दिला आहे.

हेही वाचा : iPhone 16 लॉन्च! आता आयफोन 15, 14 आणि 13 किती रूपयांनी होणार स्वस्त?

उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.  

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT