Nitesh Rane : “पोलीस माझं काही वाकडं करु शकत नाही, आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय”

मुंबई तक

Nitesh Rane Latest News : हिंदू आक्रोश मोर्चामध्ये बोलताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी इशारा वजा विधान पोलिसांना उद्देशून केले. ते नेमके काय म्हणाले, वाचा…

ADVERTISEMENT

Nitesh Rane made controversial statement in malashiras
Nitesh Rane made controversial statement in malashiras
social share
google news

Nitesh Rane Statement : वेगवेगळ्या मुद्द्यांवरील भूमिकांमुळे चर्चेत राहणारे आमदार नितेश राणे यांनी एक विधान केलं आहे. पोलिसांसमोर सांगतो. माझं काही वाकडं करू शकत नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर (देवेंद्र फडणवीस) बसला आहे, असे चिथावणीखोर विधान नितेश राणे यांनी केले.

माळशिरसमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये बोलताना नितेश राणे यांनी प्रक्षोभक भाषण केले.

नितेश राणे भाषणात काय बोलले?

आमदार राणे म्हणाले, “नितेश साहेब कार्यक्रम करून टाकला, आता पोलीस मागे लागले आहेत, वाचवा. झाल्यानंतर फोन करा. विचारायला फोन करू नका. झाल्यानंतर सुखरुप घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल, एवढा विश्वास तुम्हाला देतो.”

हेही वाचा >> “ज्यांच्या नोंदी आहेत, त्यांनाच OBC आरक्षण”, CM शिंदे स्पष्टच बोलले

याच मुद्द्याला धरून नितेश राणे पुढे म्हणाले,”पोलिसांच्या समोर देतो. माझं काही वाकडं करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर. काही होत नाही आम्हा लोकांना. आम्ही असंच बोलतो. कारण आम्ही हिंदू म्हणून हिंदूंच्या बरोबर उभे राहण्यासाठी आलो आहे. कुणाच्या उगाच वाकड्यात जाण्यासाठी आलेलो नाही.”

हे वाचलं का?

    follow whatsapp