लाइव्ह

Mumbai rains live: मुंबईत उतरल्या एनडीआरएफच्या तुकड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबईत एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मुंबईला पुढील २४ तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
social share
google news

Mumbai rains latest updates: पावसाने मुंबईला वेठीस धरल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईतील पावसाचा जोर कायम आहे. त्याचबरोबर पुढील काही तास महत्त्वाचे असून, अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. 

ADVERTISEMENT

मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांमध्ये अतिमुसळधार पाऊस अखंड सुरू आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी साचले. अंधेरी भुयारी मार्गही पाण्याखाली गेल्याने बंद करण्यात आला आहे. 

पुढील २४ तासांत अतिमुसळधार पाऊस मुंबईत होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून, पोलीस प्रशासन तसेच बीएमसी प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

ADVERTISEMENT

संततधार पावसामुळे मुंबईमध्ये कुठे कशी स्थिती आहे? लोकल रेल्वे सेवाबद्दलचे ताजे अपडेट्स वाचा...

लाइव्हब्लॉग बंद

  • 03:32 PM • 22 Jul 2024

    Mumbai Rains Live : मुंबई काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

    मुंबई हवामान विभागाच्या अंदाजाप्रमाणे, पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल. काही ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. अधूनमधून 45-55 किमी ताशी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे २८°C आणि २४°C च्या आसपास असेल.

     

  • 12:12 PM • 22 Jul 2024

    Mumbai Rains Live: मुंबईत उतरल्या एनडीआरएफच्या तुकड्या

    मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पुढील काही तासांमध्ये पाऊस वाढणार आहे. अनेक ठिकाणी आधीच पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. 

    या पार्श्वभूमीवर एनडीआरएफचे तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. वसई (पालघर), घाटकोपर, पवई (कुर्ला), ठाणे, महाड (रायगड), खेड आणि चिपळून (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. 

    ज्या भागात भूस्खलन होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांवरही एनडीआरएफ लक्ष ठेवून आहे.

  • 09:13 AM • 22 Jul 2024

    Mumbai Rains Live : मुंबईत पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पाऊस

    हवामान विभागाने मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये पुढील ३ ते ४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

     

  • 09:10 AM • 22 Jul 2024

    Mumbai Local Train Live Status : मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत

    मुसळधार पावसाने मुंबईला झोडपून काढले आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांना कालव्याचे स्वरुप आले आहे. एकीकडे रस्त्यावर पाणी भरल्याने वाहतूक मंदावली आहे. दुसरीकडे लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. 

    सिग्नलमध्ये बिघाड झाल्याने मध्य रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या उशिराने धावत आहे. गाड्या विलंबाने धावत असल्याने कल्याण रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी बघायला मिळाली. 

follow whatsapp

ADVERTISEMENT